• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मध्यावधी निवडणुकांची शक्यता : उध्दव ठाकरे

Admin by Admin
November 5, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मध्यावधी निवडणुकांची शक्यता : उध्दव ठाकरे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व घरोघरी जावे, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला.

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. त्यात त्यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करून कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत ठाकरे यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. गेल्या चार-पाच दिवसांत ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ निहाय तयारीचा आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे.

राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठय़ा घोषणा करायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्येही त्यांनी मोठे प्रकल्प व गुंतवणुकीच्या घोषणा केल्या व निवडणुका जाहीर झाल्या. राज्यातील सरकारमध्ये अस्थिरता असून काही आमदार नाराज असून फुटण्याचा विचार करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही काळाने अपेक्षित आहे. या पाश्र्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांची शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आपले सरकार असताना केलेली कामगिरी घरोघरी पोचविण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. दरम्यान, ठाकरे यांनी आमदार फुटू नये, म्हणून मध्यावधी निवडणुकीचे भाकीत केल्याची टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.

Previous Post

पंढरीच्या कार्तिकी वारीत पोलिसांची अनोखी शक्कल ; वारकरी बनून पकडले २६ चोरटे..

Next Post

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पत्नीचा छळ केल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल.

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group