• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिंदे गटातील शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याने राज्य सरकारमध्ये खळबळ : सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगल्या..?

Admin by Admin
October 16, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
शिंदे गटातील शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याने राज्य सरकारमध्ये खळबळ : सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगल्या..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Shahaji Bapu Patil On Vidhan Parishad :सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील नेहमीच चर्चेत असतात.

आता त्यांनी केलेल्या एका नव्या वक्तव्याची चर्चा होत आहे. त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे इशारा करत म्हटलं की, सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखं विधान परिषदेवर पाठवा. शहाजीबापूंच्या या अजब मागणीनंतर तालुक्यात वेगवेगळी चर्चा सुरु आहे.

गुरसाळे येथे पार पडलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपूजन प्रसंगी ते बोलत होते. ‘काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे राज्यत चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून काढता पाय घेतला काय? अशी टीका विरोधकांकडून केली‌ जाऊ लागली आहे.

शहाजी पाटील पुढं म्हणाले की, पंढरपूरमधून परिचारक आहेत, मंगळवेढ्यातून समाधान अवताडे तर माढ्यामधून बबन दादा म्हणताहेत माझं पोरग पाठवतो. आपलं झाडी डोंगर असं फेमस झालंय की आपल्याला काय नांदेडमध्ये गेलं की गर्दी, कोकणात गेलं तरी गर्दी. त्यामुळे मला तुमच्यासारखं विधानपरिषदे वर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या, अशी मागणी भर सभेत आमदार पाटील यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘काय झाडी, काय डोंगार’फेम बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी आपल्याला चक्क विधान परिषदेवर पाठविण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे. आमदार पाटील यांच्या मागणीनंतर शिंदे गटात आणि सांगोला मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.

सांगोल्याचे दिवगंत शेकापचे नेते कै.भाई गणपतराव देशमुख यांच्याकडून सतत पराभव स्वीकारणारे शहाजी पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन अवघ्या काही मतांच्या फरकाने सांगोल्यातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. पुढच्या निवडणुकीत शेकापचे आव्हान मोठे राहणार याची जाणीव झाल्यानेच आमदार शहाजी पाटील यांनी आता विधानसभेऐवजी विधान परिषदेवर पाठवण्याची विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे काय अशी चर्चा मतदार संघात सुरु झाली आहे.

Previous Post

खासदार संजय पाटलांनी दिली माजी कृषिमंत्री विश्वजीत कदम यांना भाजपात येण्याची थेट ऑफर : पुन्हा चर्चांना उधाण.!

Next Post

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group