कुपवाडमधून विजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस अर्धवट असणारा संरक्षक कठडा व उघडे चेंबर यामुळे वारंवार अपघाताची मालिकाच सुरू आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी झोमॅटो वाला उघड्या नाल्यात गाडीसहित पडून जखमी झाला होता.त्यावेळी ही मनपा प्रशासनास सदर प्रकरण निदर्शनास आणून दिले होते पण त्याकडे प्रशासनाने सोपस्कारपणे दुर्लक्ष केले होते.
कुपवाडमधून विजयनगरकडे जाणारा रोड हा विजयनगर येथे असलेल्या जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयामुळे या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते.त्यातच पाटील [बनाटे] मळ्याजवळ ह्या ओढ्याच्या पुढे लाड शाळा आहे.शाळेला जाणाऱ्या लहान मोठ्या मुलामुलींच्या येण्या जाण्याच्या मार्गावर ओढा आहे.त्या ओढ्यावर असणाऱ्या रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.व अपघात होत आहेत.
असाच अपघात काल सायंकाळी 4.30 च्या दरम्यान घडला.यावेळी वाहनचालकासह दोन लहान मुली गंभीरपणे जखमी झाल्याचे समजले.
सदर घडलेल्या प्रकाराबाबत गोपनीय खबऱ्या व कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने आक्रमकपणे आवाज उठवला व मनपा प्रशासनास जाब विचारला.व काल झालेल्या घटनास्थळी मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना तातडीने बोलावून घेतले.व सदर नाल्यावर सी.डी वर्क चे काम आजच्या आज चालू झाल्याशिवाय हटणार नाही अशी आक्रमक भूमिका समितीने घेतली.

या घटनेची माहिती मिळताच महापौर मा.दिग्विजय सूर्यवंशी व स्थायी समिती सभापती मा.धीरज सूर्यवंशी यांनी या नाल्याची कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकारी,मनपा अधिकारी,बांधकाम अभियंता यांच्यासमवेत पाहणी केली.यानंतर महापौर व सभापती यांनी यावर तोडगा काढण्यासाठी कुपवाड प्रभाग समिती क्र.०३ कार्यालयात अतिरिक्त आयुक्त,सहा.आयुक्त, एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मा.अविनाश पाटील साहेब,नगरसेवक,संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली. कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मा.महापौर,स्थायी समिती सभापती यांनी ठेकेदाराला नाल्याच्या सी.डी वर्कचे काम आजच्या आज चालू करण्याचे आदेश दिले.

यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग,नगरसेवक विष्णू माने,नगरसेवक शेडजी मोहिते,संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे,प्रवीण कोकरे,संतोष माने,अनिल कवठेकर, प्रकाश व्हनकडे,राजेंद्र पवार,रमेश पाटील,समीर मुजावर, प्रकाश पाटील,अमर दीडवळ,सुरेश साखळकर, विठ्ठल संकपाळ,अशोक रासकर,विनायक बळोलदार,करीम मुजावर यांच्यासह असंख्य नागरिक, बंधू-भगिनी,पत्रकार बंधू उपस्थित होते..

