• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळ | विट्यातील डॉक्टरची रुग्णालयातच आत्महत्या

Admin by Admin
September 19, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खळबळ | विट्यातील डॉक्टरची रुग्णालयातच आत्महत्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा: खबऱ्या प्रतिनिधी / शहरातील प्रसिद्ध डॉ. रावसाहेब रेवबा ऊर्फ आर. आर. पवार (वय ७०) यांनी त्यांच्या रुग्णालयातच पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता उघडकीस आली.

विटा-मायणी रस्त्यावरील पंचमुखी गणपती मंदिराजवळील पवार हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली.

विटा (गांधीनगर) येथील डॉ. रावसाहेब पवार यांचे येथील पंचमुखी गणपती मंदिराजवळील शालीमार ज्वेलर्स इमारतीतील मजल्यावर ‘पवार हॉस्पिटल’ गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होते. डॉ. पवार यांनी काही महिन्यांपासून प्रॅक्टिस बंद केली होती. तरीही ते अधुनमधून रुग्णालयात जाऊन बसत होते. रविवारी ते रुग्णालयात आले हाेते. त्यांनी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला.

त्यांनी याची कल्पना तातडीने पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठवून दिला.

डॉ. पवार यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात पसरताच अनेकांना मोठा धक्का बसला. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. डॉ. पवार यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Previous Post

मिरज, खानापूरसह अन्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवू.

Next Post

कासेगाव | एसटी प्रवाशांना लुटणार्‍या महिलांची टोळी जेरबंद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज तालुक्यात पुन्हा सावकारी फोफावली : व्याजबट्टा प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा

कासेगाव | एसटी प्रवाशांना लुटणार्‍या महिलांची टोळी जेरबंद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group