• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज, खानापूरसह अन्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवू.

मिरजेची जागा भाजपाला देऊन मोठी चूक केल्याची कबुली..

Admin by Admin
September 18, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरज, खानापूरसह अन्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवू.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली –खबऱ्या प्रतिनिधी / मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असतानाही ही जागा आम्ही युतीच्या वाटाघाटीत भाजपाला सोडणे ही आमची चूक होती, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, सांगलीचे आणि माझे नाते जवळचे आहे. सांगली जिल्हा हा हिंदुत्ववादी विचारधारेचा आहे. युती करताना मिरज मतदारसंघ भाजपाला सोडून दिल्याची चूक सुधारून मिरज, खानापूरसह अन्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवू. सांगली जिल्ह्याला ताकद देऊन शिवसेना भक्कमपणे उभी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकसंधपणे काम केल्यास यश निश्चितपणे मिळेल. जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी आतापासून तयारीला लागावे. पक्षाला अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या शिवसैनिकांना योग्य संधी दिली जाईल. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, खासदार विनायक राऊत, सुषमा अंधारे, जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, सुजाता इंगळे, बजरंग पाटील, रणजीत जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भगवा फडविण्याचा निर्धार

शिवसेना, युवासेना, महिला आघाडीसह सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासह संघटनात्मक बांधणी मजबूत करून सांगलीमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

धक्कादायक : चंदिगड विद्यापीठातील ६० मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ लिक, ८ विद्यार्थीनींचा आत्महत्येचा प्रयत्न ?

Next Post

खळबळ | विट्यातील डॉक्टरची रुग्णालयातच आत्महत्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खळबळ | विट्यातील डॉक्टरची रुग्णालयातच आत्महत्या

खळबळ | विट्यातील डॉक्टरची रुग्णालयातच आत्महत्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group