• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक! जतमध्ये चौघा साधूंना बेदम मारहाण

Admin by Admin
September 13, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
धक्कादायक! जतमध्ये चौघा साधूंना बेदम मारहाण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत : खबऱ्या प्रतिनिधी / मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमधील लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी ही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने पालघर सारखी घटना होता-होता टळली आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.

जत तालुक्यातल्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लवंगा येथे चौघा साधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरहुन जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते.

यावेळी लवंगा या चौघा साधूंनी रात्रीच्या सुमारास गावातल्या एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून निघाले असता, एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला, त्यातून काही ग्रामस्थांना ही मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. यानंतर ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर साधू आणि ग्रामस्थांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर या साधूंकडे चौकशी केली असता,या साधूंच्याकडे मिळालेले आधार कार्ड आणि त्यानंतर संबंधित उत्तर प्रदेश मधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखडयाचे साधू असल्याचं समोर आलं आणि खरे साधू असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर या साधुनी मोठ्या मनाने ग्रामस्थांच्या विरोधात कोणतेही तक्रार नसून गैरसमजुरीतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणी कोणाची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही,अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी पंकज पवार यांनी दिली. तर चौकशीनंतर साधूंनी पंढरपूरकडे देवदर्शनासाठी प्रस्थान केले. मात्र या सर्व मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर काही वर्षांपूर्वी पालघर या ठिकाणी साधूंना, अशाच प्रकारे चोर समजून मारहाण केल्याने खुनाचा प्रकार घडला होता, तशीच पुनरावृत्ती सुदैवाने लवंगा येथे होता-होता टळली.

Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंची राज्यभर ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’

Next Post

कबनुर ग्रामपंचायत सदस्यांकडून सफाई कामगारांस अर्वाच्च शिवीगाळ ,बघून घेण्याची धमकी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कबनुर ग्रामपंचायत सदस्यांकडून सफाई कामगारांस अर्वाच्च शिवीगाळ ,बघून घेण्याची धमकी..!

कबनुर ग्रामपंचायत सदस्यांकडून सफाई कामगारांस अर्वाच्च शिवीगाळ ,बघून घेण्याची धमकी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group