• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाच्या मनगटाचा घेतला चावा : शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल.

Admin by Admin
September 13, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाच्या मनगटाचा घेतला चावा : शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा शहर पोलिस ठाण्यात दोन गट तक्रार द्यायला आल्यानंतर त्यांच्यामध्ये ठाण्यातच झंगाडपकाड सुरू झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यावेळी एका महिलेने महिला पोलिसाच्या मनगटाचा चावा घेत खळबळ उडवून दिल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान, पोलिसांनी सहा जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

जावेद सय्यद, पूजा सय्यद, अक्षय शिवगण, अमृता शिवगण, जया शिवगण, पूजा शिवगण (सर्व रा. सदरबझार व रविवार पेठ सातारा) यांच्याविरुद्ध महिला पोलिस पूजा थोरात यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 10 रोजी रात्री उशिरा घडली आहे. यातील संशयित आरोपी हे एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, यावेळी संशयित पोलिस ठाण्यात आल्यानंतरही ते भांडत होते. वाद होऊ नये, यासाठी पोलिस सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत असताना संशयित भिडले. यामुळे तक्रारदार महिला पोलिसासह इतर पोलिस भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करू लागले.

यावेळी संशयितांपैकी एका महिलेने तक्रारदार महिला पोलिसाच्या मनगटाचा चावा घेतला. याचवेळी दुसर्‍या एका संशयिताने पोलिस ठाण्यातील काचेवर डोके आपटून काचेचे नुकसान केले. पोलिस ठाण्यात दोन गटाचा धुडगूस झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांविरुध्द शासकीय कामात अडथळ्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Previous Post

जिल्हा मध्यवर्ती बँकेत बदल्यांवरुन संचालकांमध्ये मतभेद : कामकाज विस्कळीत होण्याचा धोका..?

Next Post

मुख्यमंत्री शिंदेंची राज्यभर ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मुख्यमंत्री शिंदेंची राज्यभर ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’

मुख्यमंत्री शिंदेंची राज्यभर ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group