• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रशासनाच्या पुढाकाराने दोन्ही गटातील कमानीचा वाद मिटला..! पोलीस प्रशासनातील खमक्या अधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक व योग्यच..! ठाकरे-शिंदे गट समाधानी.

Admin by Admin
September 3, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
प्रशासनाच्या पुढाकाराने दोन्ही गटातील कमानीचा वाद मिटला..! पोलीस प्रशासनातील खमक्या अधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक व योग्यच..! ठाकरे-शिंदे गट समाधानी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : गोपनीय खबऱ्या (investigative reporter)
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकदार होऊ लागला आहे. जागोजागी हा संघर्ष अधिक उफाळून येतो आहे.

मिरजमध्ये शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले. गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या कमानीवरुन दोन्ही गटात तणाव निर्माण झाला. प्रकरण हातघाईवर आले. मात्र, सांगली पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच हस्तक्षेप केला. ज्यामुळे वाद टळला.

मिरज येथे गणेशोत्सवासाठी स्वागत कमान उभारण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून दोन्ही बाजूंनी अर्ज आले होते. दोन्ही बाजूंनी एकाच जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता. दरम्यान, दोन्ही बाजूंनी हा संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे होती.

मिरज शहराला मोठी परंपरा आहे. मिरज शहरात गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गणेशविसर्जनाने या उत्सवाची सांगता होते. गणेशविसर्जना दिवशी शहरात विविध ठिकाणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना स्वागत कमानी उभारतात. शिवसेनेचाही यात समावेश असतो. मात्र, यंदा शिवसेनेत पडलेली फूट पाहता एकाच जागेसाठी दोन दोन अर्ज दाखल झाले. त्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. एकाच जागेवर दोन्ही बाजूंनी दावा सांगितल्याने पोलिसांनी दोन्ही गटांनाही परवानगी नाकारली. मात्र, संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे दिसल्याने उत्सव आणि कायदा याचा संगम साधत पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यावहारिकता दाखवून यावर सामोपचाराने तोडगा काढला.

पोलिसांनी दोन्ही गटासोबत स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर दोन्ही गटांनी परस्परांमध्ये चर्चा केली त्यातून त्यांनी स्वागत कमान आणि स्टेजसाठी पर्यायी जागांचा विचार सामोपचाराने केला. दोन्ही बाजूंकडून कमानीवरुन सुरु झालेला वाद सध्यातरी मिटला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

🛑 प्रकरण काय..?

खबऱ्याला मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेत विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी हक्क सांगितल्याने पोलिसांनी दोन्ही गटांना स्वागत कमानीस परवानगी नाकारली होती.परंतु, आज मात्र या वादावर तोडगा काढल्याने दोन्ही गटासह मिरजकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

स्वागत कमानीस परवानगी न देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत यावर सामंजस्याने तोडगा काढला.

विसर्जन मिरवणूक मार्गावरील भव्य स्वागत कमानी मिरजेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. यंदा मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानीना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षी स्वागत कमानीवर ठाकरे गट व शिंदे गटाने दावा केल्याने हा वाद पोलिसांत पोहोचला होता. आठवडाभर स्वागत कमानीची परवानगी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दोन्ही गटांनी माघार घेण्यास नकार दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कमानीस परवानगी नाकारल्याची लेखी सूचना शुक्रवारी दोन्ही गटांना दिली होती. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने कमानीस परवागनी मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आज महाराणा प्रताप चौकात दोन्ही गट आमने सामने येण्यापूर्वीच मिरज शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी ,गुप्तचर विभागाचे विशेष अधिकारी कर्मचारी तातडीने उपस्थित झाले.

जिल्हाप्रमुख विभुते व माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी ४० वर्षांच्या परंपरेनुसार शिवसेनेच्या स्वागत कमानीला परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली होती. परवानगी मिळेपर्यंत कमानीच्या जागेवर शुक्रवारपासून शिवसेना कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. पोलिसांनी आम्हाला तुरुंगात टाकावे किंवा कमानीला परवानगी द्यावी, याबाबत आता माघार घेणार नसल्याचेही विभुते यांनी सांगितले होते.तर शिंदे गटातून विजयराव शिंदे सुद्धा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत होते.

यावेळी तानाजी सातपुते, संदीप माळी, सुनीता मोरे, चंद्रकांत मैगुरे, विजयराव शिंदे, गजानन मोरे, किरण राजपूत, आनंद रजपूत, विवेक उर्फ पप्पू शिंदे, केदार गुरव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

🛑 प्रशासनावर सेनेचे दोन्ही गट समाधानी..!

ठाकरे गटाच्या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेसह निष्ठा सर्वोच्च असल्याचा संदेश आहे. शिंदे गटाच्या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे. मात्र दोन्ही कमानींना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने यावरून संघर्षाची चिन्हे दिसत होती. मात्र आता वाद संपुष्टात आल्याने शिवसेनेचे दोन्ही गट प्रशासनाच्या निर्णयावर समाधानी आहेत.

Previous Post

हे फक्त मिरजेतच घडतं। : गणरायाची मिरवणूक मशिदी समोर आली ,आणि काय झालं… वाचा सविस्तर..

Next Post

संस्थेचा बोगस ठराव आणि बोगस पत्राद्वारे मिळकत केली गहाणखत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
स्वराज्य योध्दा प्रतिष्ठानच्या मनोज महाडीक यांनी पंचायत समिती लढवावी

संस्थेचा बोगस ठराव आणि बोगस पत्राद्वारे मिळकत केली गहाणखत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group