• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिंदे फडणवीस सरकार कोसळणार?

Admin by Admin
August 26, 2022
in राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | २-३ दिवसांत भाजपचं सरकार येणार ? या केंद्रीय मंत्र्याने केलं सूचक विधान..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (खबऱ्या प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रे राज्यपालांच्या सचिवालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे या सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. त्यांनी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी. त्यासोबत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत भाजपच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.

अशी माहिती मागितली होती. त्यावर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी या मुद्यांची माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांना दिले आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे शिंदे आणि फडणवीस यांना सरकार स्थापनेची परवानगी दिली,असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.

राज्यपाल सचिवालयाने दिलेल्या या माहितीनंतर राज्यातील एकनाथ शिंदे गट,भाजप काय करणार याची उत्सुकता असणार आहे तर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Previous Post

कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करीला वरदहस्त कोणाचा?

Next Post

मिरजेपासून काही अंतरावर आयकरची छापेमारी..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेपासून काही अंतरावर आयकरची छापेमारी..?

मिरजेपासून काही अंतरावर आयकरची छापेमारी..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group