• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील अपहरण झालेल्या शासकीय कंत्राटदाराचा नदीपात्रात आढळला मृतदेह, घातपात झाल्याचा पोलिसांचा अंदाज..?

Admin by Admin
August 17, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीतील अपहरण झालेल्या शासकीय कंत्राटदाराचा नदीपात्रात आढळला मृतदेह, घातपात झाल्याचा पोलिसांचा अंदाज..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : सांगलीतील अपहृत बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राम मंदिर परिसरात राहणाऱ्या शासकीय कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक यांचे त्यांच्या गाडीसह अपहरण करण्यात आले होते. सदरची घटना 13 ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ ते पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास मिणचे मळा ते तुंगकडे जाणाऱ्या रोडवर घडली. तुंग येथे प्लॉट दाखवण्याचा बहाणा करून तुंग येथे नेऊन त्यांचे अपहरण करण्यात आले होते. माणिकराव विठ्ठल पाटील (54) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी विक्रमसिंह माणिकराव पाटील (28) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करत पोलीस त्यांचा शोध घेत होते.

🛑 पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली

माणिकराव पाटील हे सांगलीतील बांधकाम व्यावसायिक होते. 13 ऑगस्ट रोजी प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांना तुंग येथे नेले. त्यानंतर तेथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. माणिकराव घरी परतले नाही, त्यांच्याशी संपर्कही होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या मुलाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध सुरु केला. तपासादरम्यान त्यांची गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात सापडली. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास सांगली कवठेपिरान गावच्या हद्दीत नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना आढळला. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हा मृतदेह पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसही चक्रावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून घातपताची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

🛑 मराठा क्रांती मोर्चाचे डॉ संजय पाटील यांचे माणिकराव सख्खे मेहुणे

माणिकराव पाटील हे गेली 25 वर्षे सांगलीत बांधकाम व्यावसायिक आणि रस्ते कंत्राटदार म्हणून परिचित होते. त्यांचा मुलगा विक्रमसिंह हा देखील त्यांना व्यवसायात मदत करतो, तर मुलगी रेवा ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्यांच्या घरी मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांचे मूळगाव वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील आहे. शालेय शिक्षण गोटखिंडी येथे तर डिप्लोमा लठ्ठे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हसत खेळत स्वभावाच्या व्यक्तीचा असा दुर्दवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे डॉ संजय पाटील यांचे माणिकराव पाटील हे सख्खे मेव्हणे असून, त्यांच्यावर गोटखिंडी येथे मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post

५० घरफोडीचे उघड केले गुन्हे आणि जेरबंद झाले मोबाईल -इकबाल-घायल-शिंदे..! सांगली एलसीबी ची धडाकेबाज टीम आणि सेनापती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे..!

Next Post

नितीन गडकरी यांचे ‘अडवाणी’ होण्याच्या वाटेवर..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नितीन गडकरी यांचे ‘अडवाणी’ होण्याच्या वाटेवर..?

नितीन गडकरी यांचे ‘अडवाणी’ होण्याच्या वाटेवर..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group