हेचि दान देगा देवा।
तुझा विसर नं व्हावा।।
पंढरीच्या चंद्रभागेच्या तिरी २८ युगे विटेवर उभे राहून भाविक भक्तांना अध्यात्माचा व समतेचा विचार देणाऱ्या व त्यांचे जिवन अधिक सुखकर व सुंदर बनविणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन मिरजेतील मंगळवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौकलगत असणाऱ्या गर्डर विठ्ठल मंदिर येथील भाविकांनी आज कृष्णाघाट येथे जाऊन ‘श्री’ च्या मूर्तीला जल अभिषेक घालून दिंडी पुन्हा मंदिराच्या दिशेने निघाली. हा सोहळा दरवर्षी असतो.यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती.

