• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसली, २५ वारकरी जखमी, चौघेजण गंभीर …

Admin by Admin
July 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसली, २५ वारकरी जखमी, चौघेजण गंभीर …
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कवठेमहांकाळ : खबऱ्या प्रतिनिधी: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे भरधाव पीकअप जीप वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात २५ वारकरी गंभीर जखमी झाले.

जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना कवठेमहांकाळ व मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. काेल्हापुर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील ही दिंडी आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला. अपघातानंतर पीकअपचालक घटनास्थळावरुन पसार झाला.

जखमींमध्ये अक्काताई बाळासाहेब पाटील (६९), अक्काताई अनिल कांबळे (५०), सुशांत सर्जेराव पाटील (२६), प्रकाश रामचंद्र जाधव (६०), सखुबाई शामराव पाटील (६०), बनाबाई पाटील (सर्व रा. शिवरे), सुरेश शिवाजी पाटील (५६), शिवराज बाबासाहेब चाैगुले (५९), शंकर गणपती पाटील (४२, सर्व माणगाव), राजाराम बाबा पाटील (५५, पाटणे), अक्काताई आनंदा नायकवडी (६०, रा. कारंदवाडी), हाैसाबाई नायकवडी (वय ७०), अक्काताई पाटील (५५), सुमन रंगराव कदम (४०), सुशीला सखाराम पालखे (४५), बाळाबाई कदम (४९), सुरेखा प्रकाश पाटील (५०), शंकर मारुती पाटील (४०), बाळु श्रीपती पाटील (४०), जाकाबाई नारायण जाधव (५०) यांच्यासह अन्य काही वारकऱ्यांचा समावेश आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहुवाडी तालुक्यातील पवार दिंडी आषाढी एकादशीसाठी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ हाेती. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पीकअप जीप (क्र. एमएच ०८ डब्लू ५७७१) मिरजहुन पंढरपूरकडे भरधाव वेगाने निघाली हाेती. केरेवाडीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पीकअप भरकटली. समाेर असलेल्या माेटारीच्या (क्र. एमएच ०९ ईएम ६२०४) डाव्या बाजुला घासत तशीच पुढे जात वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली. वारकऱ्यांना काही कळण्यापुर्वीच जीप उलटल्याने पंचवीसहुन अधिक वारकरी जीपखाली सापडले. दिंडीत एकच गाेंधळ उडाला. वारकरी या अपघाताने भेदरून गेले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिकेतुन कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथुन प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. जखमींपैकी चाैघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. आषाढी वारीसाठी पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीस अपघात झाल्याचे समजताच पाेलिसांसह प्रशासकीय यंत्रणा तात्काळ अपघातस्थळी दाखल झाली. अपघाताची नाेंद कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यामध्ये झाली असुन अधिक तपास सुरु आहे.

दिंडी शाहुवाडी तालुक्यातील..

अपघातग्रस्त दिंडी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे. संत बाळूमामांच्या पादुका घेऊन ही दिंडी निघते. पवार दिंडी नावाने ती ओळखली जाते. शाहूवाडी तालुक्यातील आसपासच्या गावातील वारकरी दीडशेहुन अधिक वारकरी या दिंडीत सहभागी आहेत.

Previous Post

मांत्रिकाला गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Next Post

धक्कादायक : कुपवाडमध्ये लसीकरणाचा घेतला दुसरा डोस..! भलतंच घडलं.. नागरिकांमध्ये संतापला रोष..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक : कुपवाडमध्ये लसीकरणाचा घेतला दुसरा डोस..! भलतंच घडलं.. नागरिकांमध्ये संतापला रोष..?

धक्कादायक : कुपवाडमध्ये लसीकरणाचा घेतला दुसरा डोस..! भलतंच घडलं.. नागरिकांमध्ये संतापला रोष..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group