• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : नारळ सोलण्याचे मशीनच डोक्यात घातले : कर्तबगार पोलीसांच्या हुशारीमुळे काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले..!

Admin by Admin
July 1, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगली : नारळ सोलण्याचे मशीनच डोक्यात घातले : कर्तबगार पोलीसांच्या हुशारीमुळे काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा : खबऱ्या प्रतिनिधी: दारू पिऊन शिव्या देतो, म्हणून भावानेच भावाचा नारळ सोलण्याचे लोखंडी मशीन डोक्यात घालून खून केल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली.

याप्रकरणी विनोद अर्जुन पवार (वय २४, रा.बलवडी (भा), ता. खानापूर) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे. तर वैभव अर्जुन पवार (वय ३८) असे मृताचे नाव आहे. याबाबत या दोघांची आई अलका अर्जुन पवार यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, अलका पवार या बलवडी (भा) गावी वेताळबा वस्तीवर राहतात. गुरूवारी ( दि. ३० जून) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या घरासमोर विनोद आणि वैभव पवार या भावांमध्ये मोठी वादावादी झाली. त्यावेळी वैभव हा दारू प्यायला होता. त्यानंतर काही वेळात वैभव यास चक्कर आली आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्यावर भाऊ विनोदने तात्काळ वैभव यास सांगलीच्या शासकीय रुग्णालयात येथे उपचारासाठी नेले. परंतु, तो पर्यंत वैभवचा मृत्यू झाला होता. डोक्यातून प्रचंड रक्त स्त्राव झाल्याने वैभव याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, याबाबत शंका आल्याने आई अलका पवार यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केला असता संशयित विनोदी आणि वैभव यास चक्कर येवून तो खाली पडल्यानेत्याचे डोके दगडावर आपटल्याने लागले अशी दिशाभूल करीत होता. मात्र विटा पोलिसांनी नातेवाईकांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता विनोदने नारळ सोलण्याचे लोखंडी मशिन दोन-तीन वेळा डोक्यात मारले आणि त्यामुळे वैभव याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. वैभवने आपल्याला दारू पिऊन शिवीगाळ केली. त्यामुळे संतापून आपण हे कृत्य केले, अशी विनोद याने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी विनोद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पद्‌मा कदम आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत चव्हाण, दत्तात्रय कोळेकर, पांडूरंग कन्हेरे, मोहन चव्हाण, पुंडलिक कुंभार, अक्षय जगदाळे, मारुती गायकवाड अरविंद संकपाळ यांनी केला आहे.

Previous Post

एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांची घोषणा…

Next Post

मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार

मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group