• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी..

Admin by Admin
June 22, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. माणिक व पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाच्या आत्महत्येचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गृह विभागाकडे करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले.

आठवले यांनी आज, बुधवारी म्हैसाळ येथे सामुहिक आत्महत्या केलेल्या वनमोरे कुंटुबाच्या निकटवर्तीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. आठवले यांनी घटनास्थळी पाहणी केली. या संपूर्ण घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम व मिरजेचे उपविभागीय अधिकारी अशोक वीरकर यांनी मंत्री आठवले यांना दिली.

शोकसभेत आठवले म्हणाले, म्हैसाळ गावामध्ये खासगी सावकारी वाढली आहे. वनमोरे कुंटुबीयांनी कष्टातून संसार उभा केला होता. या आत्महत्यांच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे, यांचा तपास पोलीस करत आहेत. वनमोरे कुटुंबीयांना ज्यांनी त्रास दिला, त्या सर्वांची नावे त्यांनी आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये पोलिसांना मिळून आली आहेत. पोलिसांनीही सतर्कता बाळगत आरोपींना पकडले आहे. या प्रकरणात माझ्या विभागाच्या वतीने जितकी मदत करता येईल ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. माणिक वनमोरे यांचे चुलत बंधू अनिल वनमोरे, संजय वनमोरे, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेक कांबळे, नंदकुमार कांबळे, दिलीप दबडे, मच्छिन्द्र वनखडे ,पप्पू वनमोरे, सागर वनमोरे, अमोल वनमोरे, स्वप्निल वनमोरे, योगेश वनमोरे, रवी वनमोरे, बाळू वनमोरे, धोंडीराम वनमोरे उपस्थित होते.

Previous Post

मिरजेतील वाहतूकीत बदल, ‘हा’ असेल वाहतूक मार्ग…

Next Post

सांगलीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे दिल्ली कनेक्शन.? समोर आली धक्कादायक माहिती : सविस्तर वाचा पोलिसांनी काय केलं आवाहन..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे दिल्ली कनेक्शन.? समोर आली धक्कादायक माहिती : सविस्तर वाचा पोलिसांनी काय केलं आवाहन..

सांगलीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे दिल्ली कनेक्शन.? समोर आली धक्कादायक माहिती : सविस्तर वाचा पोलिसांनी काय केलं आवाहन..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group