• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सदाभाऊंची हॉटेलात मोठी उधारी..? ८ वर्षानंतर हॉटेल मालक कार्यकर्त्यांसमोरच पडला भारी..??

Admin by Admin
June 17, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सदाभाऊंची हॉटेलात मोठी उधारी..? ८ वर्षानंतर हॉटेल मालक कार्यकर्त्यांसमोरच पडला भारी..??
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला; खबऱ्या प्रतिनिधी : गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील ६६ हजार ४६० रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून जाब विचारला.

ते कारमधून खाली उतरताच भाऊ आपला पैशाचा विषय मिटवा म्हणत अडवले. यावेळी अचानक घडलेल्या प्रकारामुळे यावेळी गोंधळ उडाला. यावेळी सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सारवासारव करीत असतील पैसे तर देऊन टाकू असे म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हॉटेल मालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले.

भाऊ माझ्या हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा..

पंचायत राज्य समितीच्या सांगोला दौऱ्यात काल बुधवारी माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांचे सांगोला पंचायत समितीच्या आवारात आगमन होताच ते कारमधून खाली उतरले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीतून अचानक मांजरी ता. सांगोला येथील हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी त्यांना आडवले. भाऊ माझे सन २०१४ मधील हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा असे म्हणून त्यांना रोखले. अचानक या प्रकारामुळे सर्वांचे लक्ष त्या दोघांच्या चर्चेकडे वळले.

यावेळी शिनगारे यांनी या बिलासाठी मी ८ वर्षे वाट पाहिली. मी सदा भाऊंना बिलासंदर्भात फोन केला असता त्यांनी मला लेका मी आता मंत्री झालोय, तुझं रं कसलं बिल असे बोलून अपमानीत केले, असा आरोप केला. ते काही नाही माझ्या बिलाचा विषयी मिटवा आणि मगच येथून जावा असे म्हणत मंत्री सदा भाऊना हॉटेल मालकाने अडवले.

तुमच्या बिलासंदर्भात मला काहीच माहिती नाही, असे म्हणताच हॉटेल मालकांनी तुमचा मुलगा सागर याला सगळे माहित आहे. मला कोणी समजवायचे गरज नाही असे ते म्हणाले. यानंतर भाऊंनी असेल बील तर देऊन टाकू असे म्हणून गर्दीतून काढता पाय घेतला आणि ते खाली मान घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले.

यावेळी रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, तालुकाध्यक्ष भारत चव्हाण, प्रा. संजय देशमुख, शंभू माने यांनी हॉटेल मालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. तुझे जे काय बील असेल ते आम्ही देतो परंतु गोंधळ घालू नको, असं यावेळी त्याला सांगितले. पण संतप्त झालेल्या हॉटेल मालकाने, तुम्ही यामध्ये पडू नका माझं मी बघून घेतो असा समज दिला.

यावेळी बंदोबस्तावरील पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाघ, पोलीस नाईक अमर पाटील यांनी गर्दीतून अशोक शिनगारे यास समजावत तेथून घेऊन गेले. घडल्या प्रकारामुळे पंचायत समिती आवारात सर्वजण काय झाले, कशाचा गोंधळ आहे म्हणून एकमेकांना विचारणा करीत होते. दरम्यान याबाबत आ. सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ खपाले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कसलेही बिल नाही. असते तर भाऊंनी ते कधीच भागवले असते. ही त्याची निव्वळ स्टंटबाजी असल्याचे म्हटले.

दरम्यान या प्रकारानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तात्काळ सांगोला पंचायत समिती येथे येऊन माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाऊंनी संबंधीत अशोक शिनगारे याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली.

Previous Post

मिरज ‘सिव्हिल’ च्या जागेचे तुकडे

Next Post

लिहायचं होतं ‘देहू’ झालं ‘जुहू’ ; अवघ्या १० कार्यकर्त्यामधले राष्ट्रवादीचे आंदोलन फसलं..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लिहायचं होतं ‘देहू’ झालं ‘जुहू’ ; अवघ्या १० कार्यकर्त्यामधले राष्ट्रवादीचे आंदोलन फसलं..?

लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू' ; अवघ्या १० कार्यकर्त्यामधले राष्ट्रवादीचे आंदोलन फसलं..?

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group