मिरज: खबऱ्या प्रतिनिधी ; मिरजेत माहेर अनाथाश्रम मध्ये महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख नामदार आदित्य ठाकरे यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला.
मिरजेतील शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम मधील मुलांना भेटून त्यांच्यासोबत साजरा केला.
शिवसेना उपनेते व सांगली सातारा संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील, शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदा बापू पवार व संजय बापू विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली धाडस युथ फाउंडेशन ,महाराष्ट्र राज्य व शिवसेना मिरज शहर यांच्या वतीने माहेर अनाथ आश्रम, मिरज व दिलासा भवन येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळेस शिवसेना मिरज शहर संघटक किरणसिंग राजपूत, शिवसेना वैदकीय मदत कक्षाचे गजानन मोरे, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, धाडस युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आनंदसिंग राजपूत, शिव वाहतूक सेना मिरज तालुका अध्यक्ष सचिन अलकुंटे, सतीश मेळवंकी, आदित्य जाधव, सुमित वैरागे, साहिल मोकाशी यांच्यासहित शिवसैनिक व धाडस युथ फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

