• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कराडमध्ये ‘एलसीबी’ ची मोठी कारवाई ,दोन अटकेत..

Admin by Admin
June 12, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कराडमध्ये ‘एलसीबी’ ची मोठी कारवाई ,दोन अटकेत..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा : खबऱ्या प्रतिनिधी : सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून सहा महिनाभरासाठी तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली. प्रतिक विजय साठे (वय 28, रा. बुधवार पेठ, कराड) व बजरंग उर्फ बजा सुरेश माने, (वय 27, रा.बुधवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याचे कडक धोरण ठेवले आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत आहे. अशा गुन्हेगारांची माहिती प्राप्त करून त्यांना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना प्राप्त होत्या. 10 जून रोजी धुमाळ यांना आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेला साठे व माने हा गुन्हेगार एसटी स्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने एसटी स्टँड परिसरात सापळा लावून प्रतीक साठे व बजा माने या दोघांनाही तातडीने ताब्यात घेतले.

दरम्यान, या कारवाईत पोलिस हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, मयूर देशमुख, मोहसीन मोमिन, प्रवीण पवार, केतन शिंदे, गणेश कचरे यांनी कारवाईत भाग घेतला.

Previous Post

शिवसेनेचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार, शिवसेना भवन समोर बॅनरबाजी..!

Next Post

शेट्टी आणि खोत दोघांनाही महाडीक यांच्या विजयाचा आनंद झालाय!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शेट्टी आणि खोत दोघांनाही महाडीक यांच्या विजयाचा आनंद झालाय!

शेट्टी आणि खोत दोघांनाही महाडीक यांच्या विजयाचा आनंद झालाय!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group