• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बंटी- मुन्ना मैत्री आणि संघर्ष..

Admin by Admin
June 11, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
बंटी- मुन्ना मैत्री आणि संघर्ष..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूरच्या राजकारणामध्ये यापूर्वी महाडिक परिवाराचा निर्विवाद प्रभाव राहिला. तर गेल्या दशकभरात सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा डंका वाजत आहे. मुन्ना- बंटी यांच्यातील मैत्री आणि संघर्ष हे ही जिल्ह्याच्या राजकारणाचे वैशिष्ट्यपूर्ण वळण राहिले आहे. २००९ साली बंटी – मुन्ना हे एकमेकांविरोधात विधानसभा निवडणुकीत उभे ठाकले होते. त्यामध्ये सतेज पाटील यांनी विजय मिळवला; तेव्हा पाटील – महाडिक यांच्यात पहिल्यांदा कटुता निर्माण झाली. पुढे राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक हे पहिल्यांदा लोकसभेसाठी रिंगणात उतरले. तेव्हा वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर सतेज पाटील यांनी त्यांचा प्रचार केला. महाडिक यांना विजयाचा गुलाल लागला परंतु त्यांनी नंतर सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी पुरेसे सहकार्य केले नाही असा आक्षेप नोंदवला. त्यातूनच सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महादेवराव महाडिक व धनंजय महाडिक यांनी अमल महादेवराव महाडिक यांना सतेज पाटील यांच्या विरोधात उभे करून विजय मिळवला.

हा पराभव जिव्हारी लागल्याने सतेज पाटील यांनी नंतर आलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा विधानपरिषदेचा प्रवास खंडित केला. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांना सहकार्य करताना धनंजय महाडिक यांचा लोकसभेचा प्रवास रोखला. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकीत पुतण्या ऋतुराज पाटील यास उभे करून अमल महाडिक यांच्याकडील आमदारकी हिसकावून घेतली. महापालिका, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक येथेही सतेज पाटील यांनी प्रभाव दाखवला. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी करून सतेज पाटील यांनी महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांना पराभूत केले.

जिगरी मैत्री आणि टोकाचे शत्रूत्व अशी वळणं घेणारा मुन्ना – बंटी यांचा प्रवास. आता महाडिक हे भाजपकडून राज्यसभेत गेले असल्याने त्यांच्याकडून सतेज पाटील यांच्या राजकारणाला आव्हान मिळणार आहे. आजच्या विजयानंतर धनंजय महाडिक यांनी आपला वाईट काळ (बॅड पॅच ) संपला आहे. महाडिक घराला वारंवार पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या भाजपच्या पाठिंबा मुळे राज्यसभेचा विजय मिळवू शकलो. या संधीचे भविष्यात नक्कीच सोने करू. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध राहीन, असे म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्यासह महा विकास आघाडीला आव्हान दिले आहे.

 

# व्हाट्सऍप ग्रुपमध्ये समाविष्ट व्हा, आणि मिळवा बातम्यांचे अपडेट्स.. https://chat.whatsapp.com/IYD5UuoZ80NBjxqO6YZ4VE

Previous Post

‘गुलाल ‘ लागलाच…… आणि पुन्हा एकदा ‘पहाटेचा’ फटका…..

Next Post

सांगली -मिरजेच्या कार्यालयातुन “त्या” कर सल्लागाराची ई.डी.कडून आक्षेपार्ह कागदपत्रे, माहिती ताब्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली -मिरजेच्या कार्यालयातुन “त्या” कर सल्लागाराची ई.डी.कडून आक्षेपार्ह कागदपत्रे, माहिती ताब्यात

सांगली -मिरजेच्या कार्यालयातुन "त्या" कर सल्लागाराची ई.डी.कडून आक्षेपार्ह कागदपत्रे, माहिती ताब्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group