• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘गुलाल ‘ लागलाच…… आणि पुन्हा एकदा ‘पहाटेचा’ फटका…..

के .रवी

Admin by Admin
June 11, 2022
in राजकीय
1 min read
0
‘गुलाल ‘ लागलाच…… आणि पुन्हा एकदा ‘पहाटेचा’ फटका…..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

यश अपयश मिळत असत, जीवनात चड उतार येत असतात. मात्र पराभवाने खचून जायचं नसत.
पराभव झाला म्हणून कोण संपत नसत, किमान राजकारणात तर हयात असे पर्यंत तर कोणताच नेता राजकारणातून कायमचा संपत नसतो…

खासदारकी गेली, चुलत भावाची आमदारकी गेली, काकांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला. हातात असणारी जिल्हा परिषद आणि महापालिका पण गेली. गोकुळ दूध संघ पण गेला…पराभवाची मालिका संपता संपेना..आता सर्व संपलं. काही शिल्लक राहिल नाही, अस विरोधक टीका करू लागले, मात्र पराभवाने खच्चून न जाता, आणि संयम न सोडता, महाडिक राजकारनात सक्रिय राहिले. आणि शेवटी गुलाल लागलाच.राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी झाले. महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला. लोकसभेवेळी शिवसेनेच्या उमेदवाराकडून झालेल्या पराभवाची परतफेड ही राज्यसभेच्या निवडणुकी वेळी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून केली.

राज्यसभेची बिनविरोध निवडणूक होईल असं, सुरुवातीला चित्र होत, मात्र अनपेक्षितपणे भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. आणि निवडणूक अटीतटीची झाली. अनेक नाट्यपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या. आणि पुन्हा एकदा देवेन्द्र फडणवीस यांच्या कडून पहाटेच्या वेळी महाविकास आघाडीला फटका देणारी बातमी समोर आली. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी झाले. महाविकास आघाडीची मत फुटली.

विद्यार्थी चळवळीतून तयार झालेलं धनंजय महाडिक यांचं नेतृत्व. महाविद्यालयातील सी आर आणि यु आर आणि विध्यापिठातील जी एस, प्रेसिडेंट निवडणुकीत पसंती क्रमांक एक आणि पसंती क्रमांक दोन या दोन्ही मतांच महत्व किती असत, हा त्यावेळी अनुभव येत असतोच. पुढे राज्यसभा असो वा विधानपरिषद इथं तर मतांचा पसंती क्रमांक एक आणि पसंती क्रमांक दोन हे महत्वाचे असतातच. क्रमांक एक मध्ये कमी मत असली तरी, धनंजय महाडिक हे पसंती क्रमांक दोनच्या मतामुळे निवडून आले. त्यांचा हा विजय राज्यच नव्हे तर देशपातळीवरील महत्वाचा ठरला आहे.

Previous Post

“नुपूर” कोणाच्या पायातले ?

Next Post

बंटी- मुन्ना मैत्री आणि संघर्ष..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बंटी- मुन्ना मैत्री आणि संघर्ष..

बंटी- मुन्ना मैत्री आणि संघर्ष..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group