• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

संजय राऊत यांनी जाहीर केली एवढ्या ‘कोटींची’ मालमत्ता..

Admin by Admin
June 1, 2022
in राजकीय
1 min read
0
संजय राऊत यांनी जाहीर केली एवढ्या ‘कोटींची’ मालमत्ता..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेना खासदार आणि राज्यसभा निवडणुकीचे शिवसेनेचे क्रमांक १ चे उमेदवार संजय राऊत यांनी आज त्यांची मालमत्ता जाहीर केली आहे.

त्यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. तसंच प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.

काय आणि किती आहे संजय राऊत यांची संपत्ती?

संजय राऊत यांच्याकडे १ लाख ५५ हजार ८७२ रूपये रोख आहेत

१ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रूपये बँकेत आहेत

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे ७२९.३० ग्रॅम सोनं दागिन्यांच्या स्वरूपात आहे. त्याची किंमत ३९ लाख ५९ हजार ५०० रूपये आहे. तर १८२० ग्रॅम चांदी आहे त्याची किंमत १ लाख ३० हजार रूपये आहे. त्यांनी एक वाहन घेतलं आहे जे २००४ मध्ये घेतलं आहे. तर दोन रिव्हॉल्वर आहेत.

संजय राऊत यांच्याकडे ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रूपयांच्या ठेवी आहेत. २०२०-२१ या वर्षात २७ लाख ९९ हजार १६९ रूपये कमावले. तर त्यांच्या पत्नी वर्षा यांनी २१ लाख ५८ हजार ९७० इतके पैसे याच आर्थिक वर्षात कमावले.

राऊत यांच्याकडे अलिबागमध्ये जमिनीचे तीन तुकडे त्यांच्या नावावर आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे पालघरमध्ये ०.७३ एकरची जाग आहे. ही जागा २०१४ मध्ये खरेदी करण्यात आली आहे. सध्या या जागेची किंमत ९ लाख रूपये आहे.

संजय राऊत यांच्या नावे रायगडमध्ये नॉन अॅग्रीकल्चर जमीनही आहे. या जमिनीची किंमत साधारण २.२० कोटी आहे. त्यांच्या पत्नी वर्षा यांच्या नावेही काही जमीन या ठिकाणी आहे. संजय राऊत यांच्या नावे दादरमध्ये एक घर आहे. भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये एक एक घर आहे. दादरमधे वर्षा राऊत यांच्या नावेही एक घर आहे. या चारही घरांची सध्याची किंमत ६ कोटी ६७ लाख रूपये आहे. संजय राऊत यांच्या नावे व्यावसायिक प्रॉपर्टीही आहे. तसंच त्यांच्या पत्नीच्या नावेही मुंबईत तीन प्रॉपर्टी आहेत. या सगळ्याची किंमत ५ कोटी ५ लाखांच्या घरात आहे. संजय राऊत यांच्या विरोधात २९ केसेस दाखल आहेत. यातल्या बहुतांश केसेस या सामनाच्या अग्रलेखातून बदनामी झाल्याने अब्रू नुकसानाचा दावा सांगणाऱ्या आहेत.

Previous Post

सांगली | राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला भाजपची ऑफर , ‘या’ आमदाराला पाडण्यासाठी राजकारण..?

Next Post

सांगली | फार्महाऊसवर छापा टाकून कारवाई केल्याची नुसतीच ‘बोंब’..? ‘मुख्य आरोपीला’ सवलत देणाऱ्यांच्या कामगिरीवर संशयाचे ‘कोंब’.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | फार्महाऊसवर छापा टाकून कारवाई केल्याची नुसतीच ‘बोंब’..? ‘मुख्य आरोपीला’ सवलत देणाऱ्यांच्या कामगिरीवर संशयाचे ‘कोंब’.?

सांगली | फार्महाऊसवर छापा टाकून कारवाई केल्याची नुसतीच 'बोंब'..? 'मुख्य आरोपीला' सवलत देणाऱ्यांच्या कामगिरीवर संशयाचे 'कोंब'.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group