• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अब्रुचं खोबरं..! कलेक्टरांचा आदर्श न घेता बहाद्दराने लाच घेतली

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक लाच घेताना जाळ्यात...

Admin by Admin
May 31, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सावधान..! या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला रेड अलर्ट
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या “तबदिलीस मनाई’ हा शेरा कमी करुन देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील वरिष्ठ लिपिकास ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.३१) केली. चारूदत्त शंकरराव गावडे (वय ५७, रा. हुजर कॉम्पलेक्स पाठीमागे, भीवघाट रोड, तासगाव, जि. सांगली) असे लिपिकाचे नाव आहे.

संपूर्ण जिल्हयासमोर आदर्श असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात हा प्रकार होणे म्हणजे खरचं अब्रुचं खोबरं झाल्याचा भाग आहे. तक्रारदार यांचे शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या “तबदिलीस मनाई’ हा शेरा कमी करुन देणे करीता गावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रूपयांच्या लाचेची (bribe) मागणी केली होती. याबाबतची तक्रार तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर आज (शुक्रवार) गावडे यांना ताब्यात घेण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भुसंपादन क्र. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी गावडे यांना तक्रारदार यांच्याकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस उप आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अविनाश सागर, भास्कर भोरे, सलिम मकानदार, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.

Previous Post

मिरजेत MIM च्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर जादूटोणा

Next Post

सांगली | राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला भाजपची ऑफर , ‘या’ आमदाराला पाडण्यासाठी राजकारण..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला भाजपची ऑफर , ‘या’ आमदाराला पाडण्यासाठी राजकारण..?

सांगली | राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याला भाजपची ऑफर , 'या' आमदाराला पाडण्यासाठी राजकारण..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group