• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत MIM च्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर जादूटोणा

कुष्ठरोगी वसाहतीमधील नागरिकांना घेऊन आंदोलनाचा दिला होता इशारा ; नेमकं कोण करतंय भानामती ,संशोधनाचा विषय.!

Admin by Admin
May 31, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
राजकारण्यांच्या गुन्हेगारीला सामान्यांच्या रक्षणकर्त्यांचे ‘बळ’..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज :खबऱ्या प्रतिनिधी; महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आणण्यात आल्यानंतरही अंधश्रद्धेशी संबंधित अनेक प्रकार सुरूच असल्याचं पाहायला मिळतं. सांगली जिल्ह्यात तर थेट राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर काळी जादू करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे.

सोमवती अमावस्याच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील एमआयएम पक्षाच्या कार्यालयासमोर हा जादूटोणा करण्यात आला आहे. काळे उडीद आणि हळद-कुंकू फेकून काळी जादू करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मिरज शहरातील किल्लाभाग येथे सांगली जिल्हा एमआयएम पक्षाचे जिल्हा कार्यालय आहे. जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे हे या ठिकाणाहून काम पाहतात. सोमवारी सोमवती अमावस्या होती आणि या दिवशीच अज्ञातांनी पक्षाच्या कार्यालयाच्या दारात काळे उडीद, हळद कुंकू फेकून ही काळी जादू केल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केला आहे.

याबाबत महेशकुमार कांबळे म्हणाले की, सकाळी कार्यालय उघडायला आलो असता मला दारातल्या फरशीवर काळे उडीद आणि हळद-कुंकू आढळून आले. हा सर्व प्रकार जादूटोण्याचा आहे. याआधीही मागच्या काही महिन्यांमध्ये असाच प्रकार झाला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा हा प्रकार घडला आहे. जादूटोण्याचा हा प्रकार राजकीय विरोधातून करण्यात आल्याचा आरोप देखील महेशकुमार कांबळे यांनी केला आहे.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2022/05/VID-20220531-WA0258.mp4

दरम्यान, राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या या प्रकाराची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत असून याप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Previous Post

खून…. वाटेगावात युवकाचा खून,नेमकं कारण अस्पष्ट…

Next Post

अब्रुचं खोबरं..! कलेक्टरांचा आदर्श न घेता बहाद्दराने लाच घेतली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सावधान..! या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

अब्रुचं खोबरं..! कलेक्टरांचा आदर्श न घेता बहाद्दराने लाच घेतली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group