• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी, राजू शेट्टी यांची घोषणा.

Admin by Admin
March 24, 2022
in मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी, राजू शेट्टी यांची घोषणा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमरावती; खबऱ्या प्रतिनिधी/ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव अमरावती जिल्ह्यातील आमदार देवेंद्र भूयार यांची अखेर संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आमदार भूयार हे संघटनेच्या कार्यप्रणाली प्रमाणे कार्य करत नव्हते.

त्यांच्यावर अनेक आरोप केले जात होते. तसेच त्यांनी संघटनेशी स्वत:ला दूर करुन घेतले होते. त्यामुळे अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हिवरखेड (जि. अमरावती) येथील शेतकरी मेळाव्यात आमदार देवेंद्र भूयार यांची संघटनेतून हकालपट्टी केल्याची मोठी घोषणा केली.

आमदार देवेंद्र भूयार हे वरुड मोर्शी मतदारसंघातून निवडून आले होते. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना त्यांनी पराभूत केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते एकमेव आमदार होते. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. दरम्यान, आज माजी खासदार राजू शेट्टी विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

आमदार देवेंद्र भूयार हे शेतकरी चळवळीतून गायब झाले आहेत अशी त्यांच्या विषयी तक्रार होती. त्यांनी स्वत:हून संघटनात्मक कार्यातून स्वत:ला बाजूला केल्याची चर्चा होती. संघटनेतील निर्णय घेताना मला विश्वासात घेतले तर मी तुमच्या सोबत अन्यथा तुमच्या शिवाय असा इशारा देखिल आमदार देवेंद्र भूयार यांनी दिला होता. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये देखिल त्यांच्या बद्दल मतभेद होते. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार नसतील तर आम्हला असला आमदार नको अशी भूमिका स्वाभिमानी विदर्भ समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होते. या सर्व पार्श्वभूमीवर संघटनेतून आमदार भूयार यांची हकालपट्टी निश्चित मानली जात होती. अखेर विदर्भ दौऱ्यावर असताना संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भूयार यांची संघटनेतून हकालपट्टी केल्याची घोषणा केली.

Previous Post

आजचे राज्यातील सहा वाजेपर्यंतचे कांदा बाजारभाव 

Next Post

आवडते नेते कोण ? विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या, “घर की मुर्गी ,दाल बराबर…..माझे आवडते नेते..!”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आवडते नेते कोण ? विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या, “घर की मुर्गी ,दाल बराबर…..माझे आवडते नेते..!”

आवडते नेते कोण ? विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या, "घर की मुर्गी ,दाल बराबर.....माझे आवडते नेते..!"

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group