• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आवडते नेते कोण ? विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या, “घर की मुर्गी ,दाल बराबर…..माझे आवडते नेते..!”

माफ करा स्पष्ट बोलतो....! 😜

Admin by Admin
March 24, 2022
in मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, विशेष
1 min read
0
आवडते नेते कोण ? विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या, “घर की मुर्गी ,दाल बराबर…..माझे आवडते नेते..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या विधानांमुळे किंवा राज्य सरकारवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच अमृता फडणवीस देखील राज्य सरकारवर आक्रमकपणे टीका करतात.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजपा रणनीती आखत असली, फडणवीस राज्यातल्या भाजपासाठी महत्त्वाचे नेते असले, तरी अमृता फडणवीस यांच्यासाठी मात्र देवेंद्र फडणवीस हे आवडते नेते नाहीत! अमृता फडणवीसांसाठी तेच आवडते नेते असतील, असा अपेक्षित समज असताना, त्याला फाटा देत अमृता फडणवीसांनी विदर्भातल्या दुसऱ्याच नेत्याचं नाव घेतलं! यावेळी मिश्किल टिप्पणी करताना “घर की मुर्गी दाल बराबर”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना अमृता फडणवीस यांना त्यांच्या आवडत्या नेत्याविषयी विचारणा करण्यात आली. “तुमचे आवडते नेते कोण?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उपस्थितांना अपेक्षित उत्तर होतं “अर्थात देवेंद्र फडणवीस!” पण झालं भलतंच. उलट अमृता फडणवीसांना घर की मुर्गी दाल बराबर वाटतेय!

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

आवडत्या नेत्याबद्दल विचारणा करताच अमृता फडणवीस मिश्किलपणे म्हणाल्या, “माझं या प्रश्नावर उत्तर फार सोपं आहे. याचं उत्तर देणं माझ्यासाठी फार काही कठीण नाही. हे पाहा, सगळ्यांसाठीच घर की मुर्गी दाल बराबर असते. त्यामुळे माझे आवडते नेते नितीन गडकरी आहेत”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या उत्तराची राजकीय वर्तुळात देखील चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा!

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. “महाराष्ट्रात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती सुरू आहे. महाराष्ट्रात आमची एकच अपेक्षा आहे की प्रगतीचं राजकारण व्हायला हवं. भ्रष्टाचार बंद व्हायला हवा”, असं त्या म्हणाल्या आहेत.

Previous Post

आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी, राजू शेट्टी यांची घोषणा.

Next Post

सातबारा एकाचा आणि वारसनोंद मात्र दुसऱ्याचीच..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सातबारा एकाचा आणि वारसनोंद मात्र दुसऱ्याचीच..

सातबारा एकाचा आणि वारसनोंद मात्र दुसऱ्याचीच..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group