• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना १५ दिवसांत देणार प्रत्येकी २ लाख…

Admin by Admin
May 24, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना १५ दिवसांत देणार प्रत्येकी २ लाख…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; मृत बांधकाम कामगारांच्या ३७ विधवा महिलांना येत्या पंधरा दिवसांत शासनाच्या योजनेनुसार प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात येतील, असे आश्वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी बैठकीत प्रकरणनिहाय सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आले.

संघटनेचे नेते कॉ. शंकर पुजारी यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मृत बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना योजनेंतर्गत आर्थिक मदत मंजूर असूनही त्यांना मिळत नसल्याबाबत तक्रार करण्यात आली. विधवा महिलांची एकूण ३७ प्रकरणे तातडीने कल्याणकारी मंडळाकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी झाला. पंधरा दिवसांत पैसे मिळतील, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.

मिरज येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या २४० घरकुलांपैकी ९० घरांचे नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी बुकिंग केले आहे. त्यांना कल्याणकारी मंडळामार्फत दोन लाख रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव सांगलीच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्वरित पाठवावा, असा आदेश मुश्रीफ यांनी दिले.

बांधकाम कामगार मुलींच्या विवाहासाठी ५१ हजार रुपये देण्याची तरतूद दोन मुलींपर्यंत वाढवण्यात यावी, पूरग्रस्त भागातील बांधकाम कामगारांच्या घरकुलांची यादी त्वरित मंजूर करावी आदी मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही मुश्रीफ यांनी दिले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस प्रा. शरयु बडवे व संघटनेचे सचिव कॉ. विशाल बडवे उपस्थित होते.

Previous Post

मिरज : प्रेयसी आणि चैनीसाठी रेल्वेत चोरायचा मोबाईल आणि महागड्या वस्तू..

Next Post

बेदाणा उत्पादन १ लाख ६० हजार टनांवर…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेदाणा उत्पादन १ लाख ६० हजार टनांवर…

बेदाणा उत्पादन १ लाख ६० हजार टनांवर...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group