• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज : प्रेयसी आणि चैनीसाठी रेल्वेत चोरायचा मोबाईल आणि महागड्या वस्तू..

Admin by Admin
May 24, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज : प्रेयसी आणि चैनीसाठी रेल्वेत चोरायचा मोबाईल आणि महागड्या वस्तू..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज: खबऱ्या प्रतिनिधी ; प्रेयसी आणि स्वत:च्या फायद्यासाठी रेल्वेत मोबाईल व रोख रक्कम जोणार्‍या शुभम विश्‍वास कांबळे (वय 26, रा. विकानंदनगर, विटा) याला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याकडून 31 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात नोेंद करण्यात आलेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुभम कांबळे हा गलाई कामगार असून तो सध्या चेन्नईत काम करीत आहे. त्याची प्रेयसी अमरावती येथे आहे. तिला भेटण्यासाठी तो अधूनमधून चेन्नईमधून अमरावती येथे येत असे. परंतु प्रवासादरम्यान तो हुबळी, मिरज, सातारा, भुसावळ आणि जळगाव इत्यादी रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी करीतअसल्याचे तपासात उघड झाले आहे.

कराड येथे दि. 30 डिसेंबर 2021 रोजी रेल्वेत मोबाईलची चोरी झाली होती. याबाबत मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तांत्रिक तपास पोलिस करीत होते. या तपासात कराड रेल्वे स्थानकातून सुलेमान खान याचा मोबाईल शुभम याने चोरी केला असल्याचे निष्पन्न झाले होते.

शुभम याने चोरलेल्या विविध मोबाईलमध्ये सुलेमान याचे सिमकार्ड वापरले असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस शुभम याच्या विटा येथील आई-वडिलांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तपासासाठी शुभम याला चेन्नईमधून बोलावून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. शुभम याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले. शुभम हा चेन्नई येथे गलाई व्यावसायिक म्हणून काम करतो. त्याची अमरावती येथे प्रेयसी आहे. तिला भेटण्यासाठी जात असताना तो विविध रेल्वे स्थानकात चोरी करीत असे.

Previous Post

संभोग करताना मृत्यू, हॉटेल मधील घटनेने खळबळ…

Next Post

बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना १५ दिवसांत देणार प्रत्येकी २ लाख…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना १५ दिवसांत देणार प्रत्येकी २ लाख…

बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना १५ दिवसांत देणार प्रत्येकी २ लाख...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group