• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पेठनाक्यावर प्रवाशाला मारहाण करून लुटले…

Admin by Admin
May 23, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पेठनाक्यावर प्रवाशाला मारहाण करून लुटले…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर; खबऱ्या प्रतिनिधी: गावाकडे निघालेल्या प्रवाशाला पेठनाका (ता. वाळवा) येथे दोघाजणांनी अडवून दांडक्याने मारहाण केली. त्याच्याकडील रोकड, पिशव्या जबरदस्तीने काढून घेतल्या.

हा जबरी चोरीचा प्रकार रविवारी पहाटे घडला.

या मारहाणीत विश्वास आनंदा देसाई (वय 45, रा. भाटशिरगाव, ता. शिराळा, जि. सांगली) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इस्लामापुरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. देसाई यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विश्वास यांचे भाऊ संदीप हा मुंबई येथे राहायला आहेत. विश्वास हे काही दिवसांपूर्वी कामानिमित्त संदीप यांच्याकडे गेले होते. रविवारी ते गावाकडे जाण्यासाठी मुंबईहून बसने निघाले. रविवारी पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास पेठनाका येथे उतरले. गावाकडे जाण्यासाठी वाहन नसल्याने शिराळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर विश्वास हे थांबले होते. गाडी न मिळाल्याने विश्वास हे चहा पिण्यासाठी कराडच्या दिशेला सेवा रस्त्याने गेले. विश्वास हे रस्त्याच्या बाजूला आडोशाला थांबले होते. त्यांनी हातातील पिशव्या खाली ठेवल्या. त्यावेळी विश्वास यांच्या पाठीमागून अनोळखी दोघेजण आले. विश्वास यांना, ‘इधर क्या कर रहे हो’, असे म्हणत त्यातील एकाने बाजूस पडलेले दांडके घेवून विश्वास यांच्या डोक्यात, छातीवर व खांद्यावर मारहाण केली. त्यावेळी दुसर्‍या एकाने झटापट करून जबरदस्तीने विश्वास यांच्या पँन्टच्या खिशातील पाकीटातील 4 हजार रुपये काढून घेतले. विश्वास यांच्या दोन बॅगा घेवून ते तेथून पळून गेले.

Previous Post

महाविकास आघाडीत बिघाडी ; काँग्रेसचा थेट मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा…

Next Post

पोलिसांच्या सूचनांचा विसर…; चोरट्यांचे टार्गेट ‘एटीएम’..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिसांच्या सूचनांचा विसर…; चोरट्यांचे टार्गेट ‘एटीएम’..!

पोलिसांच्या सूचनांचा विसर...; चोरट्यांचे टार्गेट 'एटीएम'..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group