• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाविकास आघाडीत बिघाडी ; काँग्रेसचा थेट मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा…

Admin by Admin
May 23, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
महाविकास आघाडीत बिघाडी ; काँग्रेसचा थेट मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मविआ सरकारचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

ओबीसींच्या प्रश्न सोडवा. काँग्रेसच्या ओबीसी विभागाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अन्यथा प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग (obc) राज्यभर आंदोलन करेल, अशा आशयाचं पत्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी समाजाच्या समस्यांवरुन कॉंग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी विभागाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पत्रातद्वारे दिले आहे. ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे. ओबीसींना न्याय दिला नाही, तर प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग (obc) राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,आमदारांचे निधीचे प्रश्न, महामंडळ नियुक्त्या विविध प्रश्नांवर खलबतं होणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे.

Previous Post

पवार साहेब, फाटक्या लंगोटला किती ठिगळं लावणार ?

Next Post

पेठनाक्यावर प्रवाशाला मारहाण करून लुटले…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पेठनाक्यावर प्रवाशाला मारहाण करून लुटले…

पेठनाक्यावर प्रवाशाला मारहाण करून लुटले...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group