• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

३०० सहायक पोलीस निरीक्षकांना बढती , गृहमंत्रालायकडून यादी जाहीर, वरिष्ठांच्याही होणार बदल्या..?

Admin by Admin
May 20, 2022
in मंत्रालय
1 min read
0
३०० सहायक पोलीस निरीक्षकांना बढती , गृहमंत्रालायकडून यादी जाहीर, वरिष्ठांच्याही होणार बदल्या..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी ; गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील ३०० सहायक पोलीस निरीक्षकांना दिलासा मिळाला आहे. गृहमंत्रालयाने त्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू केली असून पोलीस निरीक्षक पदासाठी पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे महिनाभरात पोलीस निरीक्षकांच्या संख्येत वाढ होणार आहे.

करोना आणि प्रशासकीय कारणांमुळे पोलीस विभागासह अन्य विभागाच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. त्यामुळे पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. यापूर्वी बदलीसाठी प्रयत्नात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदरी निराशा आली होती. आता पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पदोन्नती मिळताच पसंतीच्या शहरात बदली मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नात आहेत. येत्या १५ दिवसांत निवड यादीत नावे असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना संवर्ग मागवण्यात येणार आहे. संवर्ग स्वीकारल्यानंतर अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाणार असून सहायक निरीक्षकांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुलांच्या शाळेचा प्रश्न

सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणावरून इतरत्र बदली होईल. अशातच, जुलै महिन्यात राज्यभरातील शाळा, महाविद्यालयेही सुरू होतील. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना मुलांच्या शाळेचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. शिवाय, एका शहरातून दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची कसरतही या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी पदोन्नतीची अंतिम यादी जाहीर झाल्यास ते त्यांच्यासाठी सोयीचे ठरेल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदलीची चर्चा

राज्य पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या येत्या आठवडय़ाभरात बदल्या होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे गाठून मोर्चेबांधणी केल्याची चर्चाही जोरात आहे.

Previous Post

सांगली मिरजेत ढगांच्या गडगडाटासह पाऊस…

Next Post

गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी धडपड..! महिला पोलिस निरीक्षक “अँटिकरप्शन” च्या जाळ्यात..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत अपहरण करून एकास लुटले , तानंग फाट्याला नेऊन रॉडने केली मारहाण..

गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी धडपड..! महिला पोलिस निरीक्षक "अँटिकरप्शन" च्या जाळ्यात..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group