• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यातील १६ सहकारी संस्थाची निवडणूक जाहीर, राजकीय वातावरण तापणार..

Admin by Admin
May 19, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
0
सांगली जिल्ह्यातील १६ सहकारी संस्थाची निवडणूक जाहीर, राजकीय वातावरण तापणार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक, सांगली अर्बन, विटा मर्चंटस, एम. डी. पवार बँक, तासगाव अर्बनसह सोळा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज प्रसिद्ध करण्यात आला.

सांगली अर्बनसाठी 26 जूनला, प्राथमिक शिक्षक बँक आणि विटा मर्चंट बँक 3 जुलै रोजी, तर पवार बँकेसाठी 25 जूनला, तर तासगाव अर्बन बँकेसाठी 23 जूनला मतदान होईल. दरम्यान, या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

सहकार प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. चार महिन्यांपासून विकास सोसायटय़ांच्या निवडणुका सुरू आहेत. त्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. सहकारी बँका, खरेदी विक्री संघ यांचे रणांगण सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 15 दिवसांपूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सहकार विभागाच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिध्द केला. 16 संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता लागू झाली. त्या दिवसापासून 45 दिवसांत प्रत्यक्षात मतदान होईल. सांगली अर्बन बँकेचे 60 हजार, तर शिक्षक बँकेची सभासद संख्या सव्वापाच हजार आहे.

सांगली अर्बन बँकेसाठी 26 जूनला मतदान, तर 28 जूनला मतमोजणी होईल. 20 ते 26 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येईल, शिक्षक बँकेसाठी 3 जुलैला मतदान, तर 5 जुलैला मतमोजणी आहे. 27 मे ते 2 जून या कालावधीत उमेदवारी अर्ज भरणे, 6 जून ते 20 जूनपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे. विटा मर्चंट्ससाठी 27 मे ते 2 जूनपर्यंत अर्ज सादर करणे, 6 जून ते 20 जून माघारीची मुदत, तर 3 जुलै मतदान व 6 जुलैला मतमोजणी होईल. ईश्वरपूर येथील एम. डी. पवार बँकेसाठी 20 ते 26 मे अर्ज सादर करणे, उमेदवारी माघारी घेण्याची मुदत 30 मे ते 13 जून, तर 25 जून रोजी मतदान व त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. तासगाव अर्बनसाठी 20 ते 26 जून अर्ज भरणे, 30 मे ते 13 जून अर्ज माघारी, तर 23 जूनला मतदान, तर 24 जूनला मतमोजणी होईल.

पलूस येथील डॉ. पतंगराव कदम खरेदी विक्री संघासाठी 24 मे 30 मे अर्ज सादर करणे, 1 ते 15 जून अर्ज माघारीची मुदत, 25 जून रोजी मतदान, तर त्यानंतर मतमोजणी होईल. याशिवाय लोकमान्य सहकारी पतसंस्था, आष्टा, श्री दत्त सहकारी पतसंस्था, ईश्वरपूर, सांगली जिल्हा पोलीस सोसायटी, सांगली, लट्ठे शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, सांगली, पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था, सांगली. अहिल्यादेवी होळकर सहकारी पतसंस्था, पेड. सांगली जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्था, सांगली. सिम्बायोसिस फार्मास्युटिकल्स, दरिकोन्नर सोसायटी, दरिकोन्नर (ता. जत) व जत तालुक्यातील व्हसपेठ सोसायटीच्या निवडणुकीचा समावेश आहे.

Previous Post

पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीसच आपसांत भिडले ; वादाचे रूपांतर मारहाणीत…

Next Post

सांगली | राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी ; हाती सत्ता ;तरीही अस्वस्थता…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी ; हाती सत्ता ;तरीही अस्वस्थता…

सांगली | राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी ; हाती सत्ता ;तरीही अस्वस्थता...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group