• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीसच आपसांत भिडले ; वादाचे रूपांतर मारहाणीत…

Admin by Admin
May 19, 2022
in क्राईम
1 min read
0
पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीसच आपसांत भिडले ; वादाचे रूपांतर मारहाणीत…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

उस्मानाबाद : पोलीस अधीक्षक कार्यालयातच दोन पोलीस कर्माचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कार्यालयीन अधीक्षकांनेच लिपिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सदरील प्रकार उस्मानाबाद (Osmanabad Crime News) जिल्ह्यातून समोर आला आहे. कार्यालयीन अधीक्षक नरसिंग कासेवाड यांनी कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंतर्गत शिस्तीसाठी पोलीस दल प्रख्यात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत बेशिस्तपणा वाढल्याचे दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात असाच प्रकार बुधवारी घडला. केवळ निनावी अर्ज मागितल्याच्या कारणावरून पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने लिपिकाला लाथा, बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकीही दिली. कार्यालयीन अधीक्षक नरसिंग लक्ष्मण कासेवाड यांनी वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांना आपल्या कक्षात बोलावून घेतले.

एलसीबीत बदली झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात आलेल्या तक्रारीबाबत जबाब देण्यास सांगितले. जाधव यांनी त्यांना निनावी अर्जाची व पत्राची मागणी केली. तेव्हा कासेवाड यांनी भडकून जाधव यांना शिविगाळ व अश्लिल भाषेत बोलण्यास सुरुवात केली. आयजी साहेबांना तुझ्या विरोधात भडकावून तुझी वाट लावतो, तुला जिवंत सोडणार नाही, अशीही धमकी देत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. घडलेला सर्व प्रकार जाधव यांनी हा प्रकार अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागिय पोलीस अधिकाऱ्यांनाही सांगितला. त्यानंतर त्यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा..

Next Post

सांगली जिल्ह्यातील १६ सहकारी संस्थाची निवडणूक जाहीर, राजकीय वातावरण तापणार..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्ह्यातील १६ सहकारी संस्थाची निवडणूक जाहीर, राजकीय वातावरण तापणार..

सांगली जिल्ह्यातील १६ सहकारी संस्थाची निवडणूक जाहीर, राजकीय वातावरण तापणार..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group