• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कर्नाटकातील स्वस्त पेट्रोल-डिझेलमुळे सीमाभागातील पंप मालकांना फटका..

Admin by Admin
May 18, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
कर्नाटकातील स्वस्त पेट्रोल-डिझेलमुळे सीमाभागातील पंप मालकांना फटका..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इचलकरंजी : असिफ नदाफ; गोपनीय खबऱ्या;

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७ ते ८ रुपयांनी स्वस्त असल्याने सीमाभागातील कर्नाटकच्या हद्दीतील माणकापूर, बोरंगाव व पाचवा मैल येथील पेट्रोल पंपावर गर्दी पहायला मिळत आहे. तर याचा सीमावर्ती महाराष्ट्रातील पंप मालकांना मोठा फटका बसत आहे.

महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कर्नाटक राज्यापेक्षा जास्त आहेत, वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत येऊ लागले आहेत. दुचाकी, चारचाकीधारक सुद्धा पेट्रोल पंपावर दर पाहून आपल्या भुवया उंचावत आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या बरोबरच व्यावसायिक, कामगार, नोकरदार यांचे आर्थिक गणित बिघडलेले दिसत आहे. तर रोजच्या वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांमुळे सर्वच आर्थिक चक्रे बिघडत असल्याचे दिसत आहे.

परंतु सीमावर्ती महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सीमाभागातील कर्नाटकच्या पेट्रोल पंपांचा काही प्रमाणात फायदा होत आहे. प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये ७ ते ८ रुपयांची बचत होत असल्याने येथील नागरिक कर्नाटकच्या पंपावर गर्दी करताना दिसत आहेत. परंतु याचा फटका व आर्थिक भुर्दंड महाराष्ट्र सीमाभागात असणाऱ्या पेट्रोल पंप मालकांना सहन करावा लागत आहे.

इचलकरंजीसारख्या मोठ्या औद्योगिक शहरातील ट्रान्सपोर्ट लाईनच्या मोठ्या गाड्या, अवजड वाहने, ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्या अब्दुललाट, लाटवाडी, शिरदवाड, हेरवाड, घोसारवाड, दत्तवाड येथील अनेक गावातील वाहन धारक, वडापधारक सोबतच कार व दुचाकी धारक हे सीमाभाग असणाऱ्या कर्नाटक हद्दीतील माणकापूर, बोरंगाव, पाचवा मैल याठिकाणी जाऊन आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना सीमाभागात सर्वसामान्यांच्यासह सर्वांनाच याचा फायदा होत असताना पेट्रोल पंप मालकांना मात्र याचा तोटा होत आहे.

Previous Post

राजकारण्यांच्या गुन्हेगारीला सामान्यांच्या रक्षणकर्त्यांचे ‘बळ’..!

Next Post

जयप्रभा स्टुडिओ शुटिंगसाठी खुला करा ;अन्यथा आंदोलन..! अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इशारा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयप्रभा स्टुडिओ शुटिंगसाठी खुला करा ;अन्यथा आंदोलन..! अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इशारा.

जयप्रभा स्टुडिओ शुटिंगसाठी खुला करा ;अन्यथा आंदोलन..! अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इशारा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group