• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ताटात रस्सा पडल्याच्या कारणावरुन वादावादी, दोघांवर चाकू हल्ला ; सांगली सिव्हिल मध्ये दाखल..

Admin by Admin
May 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ताटात रस्सा पडल्याच्या कारणावरुन वादावादी, दोघांवर चाकू हल्ला ; सांगली सिव्हिल मध्ये दाखल..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुरुंदवाड; खबऱ्या प्रतिनिधी ; ताटात रस्सा पडल्याच्या कारणातून वाद होऊन दोघांवर चाकू हल्ला झाला. या घटनेत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहिद शेख उर्फ ओंकार माने (वय 25), अमीन पटेल (वय 24, दोघे रा.औरवाड, ता.शिरोळ) अशी जखमींची नावे असून, सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली असून, याप्रसंगी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेडशाळ (ता. शिरोळ) येथील हॉटेल समाधान ढाबा येथे संशयित तिघे व जखमी ओंकार माने व अमीन पटेल हे जेवायला बसले असताना एकमेकाला धक्का लागल्याने, ताटात रस्सा पडल्याने वाद झाला. या वादावादीचे मारामारीत रूपांतर झाले. तिघांपैकी एकाने खिशातील कटरने माने आणि पटेल वर वार करून त्यांना जखमी केले.

जखमी दोघांना सांगली येथील डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सपोनि बालाजी भांगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तणावपूर्ण वातावरण असल्याने औरवाड परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी पहाटे घटनास्थळी व कुरुंदवाड पोलीस ठाण्याला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली.

Previous Post

शहरातील ‘हे’ तात्काळ करा ; ..अन्यथा सेल्फी पॉईंट उखडून टाकू : शिवसेनेचा इशारा

Next Post

राजकारण्यांच्या गुन्हेगारीला सामान्यांच्या रक्षणकर्त्यांचे ‘बळ’..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राजकारण्यांच्या गुन्हेगारीला सामान्यांच्या रक्षणकर्त्यांचे ‘बळ’..!

राजकारण्यांच्या गुन्हेगारीला सामान्यांच्या रक्षणकर्त्यांचे 'बळ'..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group