• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शहरातील ‘हे’ तात्काळ करा ; ..अन्यथा सेल्फी पॉईंट उखडून टाकू : शिवसेनेचा इशारा

Admin by Admin
May 18, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
शहरातील ‘हे’ तात्काळ करा ; ..अन्यथा सेल्फी पॉईंट उखडून टाकू : शिवसेनेचा इशारा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इस्लामपूर; खबऱ्या प्रतिनिधी ; इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण व्हावे, अशी शहरवासीयांची इच्छा असताना शहरात उभा करण्यात आलेला ‘आय लव्ह उरुण-इस्लामपूर’ हा सेल्फी पॉईंट म्हणजे नागरिकांच्या मागणीची चेष्टा केल्याचा निंदनीय प्रकार आहे.

त्यामुळे नगरपालिकेने हा सेल्फी पॉईंट काढून टाकावा, अन्यथा शिवसैनिक स्वतः तो उखडून टाकतील, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

याबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे, अशी आमची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. 40 हजार शहरवासियांनी आपल्या सह्यांचे तसे निवेदन नगरपालिकेला दिले आहे. या नागरिकांच्या भावनेची कदर करून शहराचे नामांकरण होणे गरजेचे होते. मात्र नगरपालिकेने जुन्याच नावाचा सेल्फी पाँईंट उभा करून शहरवासियांच्या भावनेची चेष्टा केली आहे. पालिकेने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा शिवसैनिक हा सेल्फी पॉईंट उखडून टाकतील.

तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे, शहरप्रमुख शकील सय्यद, अंकुश माने, राजू पठाण, सूर्यकांत पाटील, विमल शेवाळे, योगेश हुबाले, अजित पाटील, कृष्णात पाटील, सतीश पाटील, सूरज पाटील, प्रदीप लोहार, सागर भोजुगडे, भूषण शिंदे, विलास नाईक यांनी हे निवेदन दिले
आहे.

Previous Post

सांगली-कोल्हापूर महामार्गाची दुरुस्ती सुरू

Next Post

ताटात रस्सा पडल्याच्या कारणावरुन वादावादी, दोघांवर चाकू हल्ला ; सांगली सिव्हिल मध्ये दाखल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ताटात रस्सा पडल्याच्या कारणावरुन वादावादी, दोघांवर चाकू हल्ला ; सांगली सिव्हिल मध्ये दाखल..

ताटात रस्सा पडल्याच्या कारणावरुन वादावादी, दोघांवर चाकू हल्ला ; सांगली सिव्हिल मध्ये दाखल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group