सांगली दि. १६: खबऱ्या प्रतिनिधी
बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट रुल २०१६ अन्वये हाॅस्पिटलनी सर्व जैववैद्यकीयक कचरा नागरीकांच्या जिवितास आणि पर्यावरणास धोका न होता शास्त्रीय पध्दतीने नष्ट करण्याचे बंधन आहे. तथापी वखारभाग मिरज येथील डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटलने पर्यावरणविषयक कायद्ये आणि नियमाची पायमल्ली करत हाॅस्पिटल बाहेर उघडयावर जैववैद्यकीयक कचरा टाकल्याचे निदर्शनास आले होते. तसेच त्याकरीता आवश्यक ती नोंदणी प्रदुषण मंडळाकडे केलेली नव्हती. हाॅस्पिटलचे सांडपाणी खंदकाच्या जागेत सोडून पर्यावरणास हाणी पोचविण्याचे कृत्य केले होते.
या प्रकारणाची गंभिर दखल घेत हाॅस्पिटल परीसराची पाहणी केली असता बेकायदेशीरपणे जैववैद्यकीयक कचरा उघडयावर टाकल्याचे निदर्शनास आले. तसेच हाॅस्पिटलमधील सांडपाणी प्रक्रीया करणारी कोणतीही यंत्रणा अस्थित्वात नव्हती. कोणतीच प्रक्रीया न करता आरोग्यास घातक सांडपाणी प्रक्रीयेविना महापालिकेच्या उघडया खंदकामध्ये सोडून देउन नागरीकांच्या जिवितास धोका उत्पन्न होणारे कृत्य या हाॅस्पिटलकडून केले जात होते आणि आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या गेल्या. सदर तक्रारीवर योग्य आणि आवश्यक कारवाई करण्यात दोन्हीही यंत्रणेने उदासिनता दाखविल्यामुळे अॅड. ओकांर वागींकर यांचेमार्फत त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली.
डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटलने पर्यावरणविषयक कायद्ये आणि नियमाची पायमल्ली केली आहे म्हणून त्यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी याकरीता जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रीय हरित न्यायालय पुणे खंडपीठ येथे समितीचे अध्यक्ष श्री. तानाजी रुईकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत न्यायालयाने तज्ञ समितीची नेमणूक केली. सदरच्या तज्ञ समितीने डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी करून न्यायालयास अहवाल सादर केला आहे. त्या अनुषंगाने प्रदुषण नियंत्रण मंडळाने डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटलला कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
नोटीसीमधील ठळक मुद्ये खालीलप्रमाणे.
१. जैववैद्यकीयक कचरा हाताळणीकरीता आवश्यक असणार्या परवानग्या नाहीत.
२. जैववैद्यकीयक कचरा साठविण्याकरीता हाॅस्पिटलमध्ये स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली नाही.
३. जैववैद्यकीयक कचरा साठविण्याकरीता कायद्याने आवश्यक असणार्या कलर कोडच्या पिशव्या वापरल्या जात नाहीत.
४. हाॅस्पिटलमधील सांडपाणी प्रक्रीया न करता महापालिकेच्या उघडया खंदकामध्ये आणि महापलिकेच्या ड्रेनेजमध्ये सोडले आहे.
५. हाॅस्पिटलच्या पॅथालाॅजी लॅबमधील कचरा साठविण्याकरीता कायद्याने आवश्यक असणार्या कलर कोडच्या पिशव्या वापरल्या जात नाहीत.
६. जैववैद्यकीयक कचरा हाताळणीकरीता आवश्यक असणारे वार्षिक रिटर्न हाॅस्पिटलने भरले नाहीत.
७. हाॅस्पिटलमध्ये वापरण्यात येणाराा जनरेटला कायद्याने आवश्यक उंचीची चिमणी बसविली नाही.
८. हाॅस्पिटलमधील कर्मचार्यांना जैववैद्यकीयक कचरा हाताळणीकरीता कायद्याने आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले नाही.
या सर्व कारणाकरीता जल (प्रदुषण प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९७४ आणि ३१अ च्या कलम ३३अ, पाणी (पी आणि सीपी) कायदा १९७४ आणि वायु (पी आणि सीपी) कायदा १९८१ आणि धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी), पर्यावरण (संरक्षण) कायदाा १९८६ अन्वये डाॅ. म्हेत्रे हाॅस्पिटल बंद का करु नये असी नोटीस देण्यात आली आहे.
सांगली-मिरज ही वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखली जाते त्याच ठिकाणी असे बेकायदेशीर, नागरीकांच्या जिवितास आणि पर्यावरणास हाणी करणार्या कोणत्याही हाॅस्पिटलची गय केली जाणार नाही असे समितीचे अध्यक्ष श्री. तानाजी रुईकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळेस विधिज्ञ सचिन पोतकुळे , रविंद्र चव्हाण ,शिवलिंग मेंढे, तोसिफ बागणीकर ,सागर शिंदे ,आसिफ मुजावर ,राजु ऐवळे,विधिज्ञ विनय पाटील ,
विधिज्ञ रुद्र पाटील ,सुनिल गिड्डे उपस्थित होते.

