पोलीस सेवेतील ललिता साळवे या लिंगबदल करून ललित साळवे झाल्याचे उदाहरण असताना अशाच आणखी एका प्रकरणात उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नाशिक येथे पोलीस दलात स्त्राr म्हणून भरती झालेल्या पोलिसांत पुरुषी हार्मोन्स आढळले आहेत.
या प्रकरणात निकाल देताना उच्च न्यायालयाने संबंधित महिलेने आतापर्यंत स्त्राr म्हणूनच आपली कारकीर्द पूर्ण केली आहे. तेव्हा राज्य सरकारने याचा विचार करून पोलिसांत तिच्यासाठी समकक्ष नोकरी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीस भरतीत सहभागी झालेल्या आणि लेखी व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका महिला उमेदवाराने न्यायालयात याचिका केली. ही महिला वैद्यकीय परीक्षेत पुरुष असल्याचे आढळून आले. तिला गर्भाशय आणि अन्य संबंधित अवयव नसल्याचे निष्पन्न झाले. स्त्राr-पुरुष अशी दोन्ही गुणसूत्रे असल्याचे उघड झाले. यामुळे तिच्या भरतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावर तिने न्यायालयात याचिका दाखल करीत ‘मी लहानपणापासून मुलगी म्हणून वाढली आहे. माझे शिक्षण आणि अन्य प्रगती मुलगी म्हणूनच झाली. आता शास्त्राrयदृष्टय़ा मी पुरुष सिद्ध होत असली तरी त्यामध्ये माझा दोष नाही. त्यामुळे मला सेवेत सामावून घ्यावे,’ अशी मागणी केली. यावर न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकादार महिलेची बाजू समजून घेतली.
सरकार सहानुभूतीने विचार करणार
‘संबंधित प्रकरण दुर्दैवी आहे, मात्र त्यामध्ये याचिकादाराची काहीही चूक नाही. तिने आतापर्यंत आपले करीअर मुलगी म्हणूनच पूर्ण केले. राज्य सरकारने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पोलीस विभागात तिच्यासाठी समकक्ष नोकरी द्यावी, असे सुचवले. त्यावर महिला म्हणून तिच्या नोकरीबाबत सहानुभूतीने विचार होत आहे. नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडून त्याबाबत अहवाल मागवण्यात आला आहे. याचिकादार महिलेचा हवालदार पदाव्यतिरिक्त अन्य पदासाठी विचार होत आहे, मात्र त्यासाठी अवधी लागणार आहे,’ असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट केले. खंडपीठाने त्याला सहमती दर्शविली.

