मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले.
विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा पार पडली. या सभेत फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला खणखणीत प्रत्युत्तर दिले.
यावेळी फडणवीस म्हणाले, तुमचं हिंदूत्व हे गदाधारीचं आहे. तु्म्ही म्हणाले आम्हाला लाथ मारली. लाथ गधा मारतो. खरा पहिलवान ठोकर मारतो. लाथ गाढव मारतो. लक्षात ठेवा हा बदललेला भारत आहे. काश्मीरमध्ये आमच्या एका हिंदूची हत्या केली तर २४ तासाच्या आत तीन दहशवाद्यांची हत्या करणारा हा नवा भारत आहे. तुम्ही सवाल विचरण्याचा आत त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये आहे. तुमच्याकडे शर्जिल आला, भारत तोडण्याचा बोलला, निघूनही गेला. तुम्ही काय-काय बोलले? एकप्रेमी प्रेमातून ऍसिड फेकतो. आमची संपत्ती घेऊन आणि दुसऱ्या सोबत लग्न केलं. ऑफिशियल घटस्फोट तर द्यायचा. कालचं भाषण सोनिया गांधी यांना समर्पित होतं अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो मला उत्तर द्या, मुंबईत कोविड काळामध्ये भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख लोकांचा मृत्यू झाला की नाही?, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली की नाही?, वसूलीच्या आड येणाऱ्यांना मनसूख हिरेन बनलं की नाही?, १०० कोटींच्या वसूलीसाठी गृहमंत्री तुरुंगात गेले की नाही?, दाऊदचा मित्र असूनही मंत्रिमंडळात आहे की नाही?, आपल्या मजूर- कामगार बांधवांना अणवानी पायांनी मुंबई सोडावी लागली की नाही?, मुंबईत मेट्रो, रस्त्यांची कामे बंद आहेत की नाही?, यशवंत जाधवची संपत्ती वाढली की नाही? आता मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही यापौकी एकाही गोष्टीवरही आपले मुख्यमंत्री बोलले का? आपले मुख्यमंत्री राज्याचे आणि देशातील पहिले मुख्यमंत्री असतील, की अडीच वर्षांमध्ये या महाशयांनी एकही भाषण राज्याच्या विकासावर दिलं नाही, राज्याच्या विषयावर, लोकांच्या समस्येवर दिलं नाही.” असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

