• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“यशवंत विचारांच्या वारसदारांला यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार”..

Admin by Admin
May 15, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
“यशवंत विचारांच्या वारसदारांला यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार”..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समाजकारण, राजकारण, सहकार यासह विविध क्षेत्रात निष्कलंकपणे, पारदर्शक काम करणारे राज्याचे सहकार पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे “यशवंत विचारांच्या वारसदारांला यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार” देऊन गौरवण्यात येत असल्याबद्दल सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्तुत्वचा घेतलेला मागोवा.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विद्यमान महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील सहकार पणन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शांत, संयमी स्वभावाबद्दल आता मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वभावा वैशिष्ट्याबाबत महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली आहे. राजकारणात अतिघाई करण्यापेक्षा आपणाला दीर्घ काळाचा पल्ला गाठायचा आहे. समाजातील सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजकीय वाटचाल अतिशय संयमाने सुरू ठेवली आहे.

आमदारकीचे रौप्यमहोत्सवी वर्ष मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सुरू आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि प्रत्येक गावात विकासाची कामे गतीने उभी करण्यासाठी मंत्री बाळासाहेब पाटील सातत्याने प्रयत्न करतात. विशेष म्हणजे झालेल्या कामाचा कधीच गाजावाजा करत नाहीत. अथवा प्रसिद्धी माध्यमांद्वारे कामांचा बोलबाला व्हावा अशी साधी अपेक्षाही ठेवत नाहीत. हिच मंत्री बाळासाहेब पाटील यांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वास्तविक पाहता शांत, संयमी स्वभावाचा काय फायदा होतो ? हे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा मागोवा घेतला तर निश्चितपणे लक्षात येईल. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते चेअरमन आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ते कॅबिनेट मंत्री हा प्रवास निश्चितच गौरवास्पद व कौतुकास्पद असा आहे. दरम्यान अनेक सत्तास्थाने आपल्या हाती असताना देखील अहंपणाचा भाव मनी न बाळगता तसेच सत्ता ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी व त्यांचे सकारात्मक काम करण्यासाठी आहे. या भावनेतून मंत्री बाळासाहेब पाटील हे आजही येणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांनाबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांची, मित्रांची कामे तितक्याच प्रामाणिकपणे करण्याचा मापदंड मंत्री बाळासाहेब पाटील यांचा आहे.

मोठेपणाचा अविर्भाव, खोटे आश्वासन, कार्यकर्ते व संबंधितांना खेळवत ठेवणे. एखाद्या व्यक्तीच्या कामाबाबत करतो, पाहतो, बघतो ही भाषा कधीही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभापासून ठेवलेली नाही. जे करणे शक्य आहे, ते प्रामाणिकपणे व परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न आजही करताहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचे आणि सध्या मंत्रीपदापर्यंत वाटचाल केलेले बाळासाहेब पाटील यांच्या स्वभावांमध्ये तिळमात्र बदल झालेला नाही. अथवा सत्तेच्या अत्युच्च शिखरावर असताना देखील त्यांचे जमिनीवर पाय घट्ट आहेत. हीच राजकारणात यशस्वी होण्याची ताकत असेल असे निश्चित वाटते. विरोधकांच्यावर कधीही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक हल्ला केला नाही. विशेषता विरोधक सातत्याने या ना त्या प्रकारे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करीत असतात. मात्र त्याला प्रतिउत्तर ही घाईगडबडीत द्यावे असा आततायीपणा कधी करीत नाहीत. एखाद्याने आरोप केला तरी तो सत्य की असत्य हा समाज ठरवित असतो. समाजाला आरोप करणारी व्यक्ती व मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यातील अंतर, फरक माहीत असतो. त्यामुळे आपण होऊन झालेल्या आरोपाला उत्तर देण्यापेक्षा समाज त्याचे मूल्यमापन करतो. मग कशाला उगाच एखाद्याला महत्त्व द्यायचे. या भावनेतून मंत्री बाळासाहेब पाटील यांची वाटचाल सुरू असते.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची समाजकारण व राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक व त्यानंतर कारखान्याच्या चेअरमनपदाची यशस्वी धुरा त्यांनी आज तागायत सांभाळलेली आहे. देशाचे नेते स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांना अभिप्रेत असणारा सह्याद्री कारखाना कराड उत्तरचे भाग्यविधाते स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांनी चालवला. त्याच क्षमतेने विद्यमान चेअरमन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील चालवत आहेत. केवळ कारखानाच चालवतच नाहीत तर ते राज्यात “सह्याद्री पॅटर्न” म्हणून कारखान्याची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.

सहकारातील अभ्यासू वृत्तीमुळेच देशाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बाळासाहेब पाटील यांना राज्य सहकारी साखर संघाचे संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्षपदी दोन वेळा काम करण्याची संधी दिली तसेच राष्ट्रीय साखर संघाचे दक्षिणमध्य महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक दाखवली. बाळासाहेब पाटील यांच्या सहकारातील अभ्यासामुळे देशाचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब पाटील यांच्यावर सहकार व पणन खात्याची जबाबदारी देत विश्वास दाखवला, हीच त्यांच्या सहकाराममध्ये दाखवलेल्या कर्तृत्वाची पोचपावती आहे. बाळासाहेब पाटील यांना त्यांच्या शांत संयमी स्वभावामुळे समाजात वेगळे स्थान आहे.

बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या चारित्र्यावर डाग लागून दिला नाही. ही त्यांची जमेची बाजू आहे. सहकारासारख्या क्षेत्रात काम करताना निष्कलंक व पारदर्शी व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सहकार चळवळ भक्कम होण्यासाठी बळ दिले आहे. गतकाळात बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण स्वत:ला झालेली असताना त्यावर उपचार घेऊन झालेनंतर लगेच दुस-या दिवशी कामास सुरुवात केली. परंपरेपेक्षाही पारदर्शी नेतृत्व व कर्तुत्व आणि यशवंत विचार जिवंत ठेवणारे व तळागाळापर्यंत पोहोचवणारे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे एकमेव राज्यातील नेते आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात लक्ष देणार – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

Next Post

“कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरे यांच्या सभेवर निशाणा …

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरे यांच्या सभेवर निशाणा …

"कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे." फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरे यांच्या सभेवर निशाणा ...

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group