• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ढालेवाडीत विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

Admin by Admin
July 14, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ढालेवाडीत विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे विजेच्या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने महादेव आप्पासाहेब खांडेकर (वय ३०, रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) या झिरो वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. १३ रोजी दुपारी घडली. घटनेनंतर खांडेकर यांच्यासोबत असलेला वीज वितरण कंपनीचा कर्मचारी पसार झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ढालेवाडी हद्दीतील तळेवाडी वस्तीवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. वीज वितरण कंपनीचा कर्मचारी ट्रान्सफॉर्मरजवळच उभा होता, तर खासगी कर्मचारी महादेव खांडेकर हे खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरू करण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडून वीजपुरवठा खंडित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. वीज बंद झाल्याची खात्री करूनच खांडेकर खांबावर चढले होते; मात्र काम सुरू असतानाच अचानक वीजप्रवाह सुरू झाला. यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून खांडेकर गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृत महादेव खांडेकर यांच्या निधनामुळे इरळी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि वडील असा परिवार आहे.

सखोल चौकशीची मागणी

दुर्घटना घडताच खांडेकर यांच्यासोबत असलेला वीज वितरण कंपनीचा कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दुरुस्तीचे काम सुरू असताना संबंधित वीज कंपनीचे जबाबदार अधिकारी कुठे होते, वरिष्ठ कार्यालयाला सूचना दिल्यानंतरही वीजप्रवाह अचानक कसा सुरू झाला, आणि घटनास्थळी नेमके कोण उपस्थित होते, या सर्व बाबींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Previous Post

बेडगच्या ग्रामसभेत पाणंद रस्त्यावरून खडाजंगी

Next Post

वारीसाठी सातारा पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था, २७०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर, २४ सराईत गुन्हेगार तडीपार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वारीसाठी सातारा पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था, २७०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर, २४ सराईत गुन्हेगार तडीपार

वारीसाठी सातारा पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था, २७०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर, २४ सराईत गुन्हेगार तडीपार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group