• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सातारा DPDC बैठकीत विकासापेक्षा महायुतीच्या केमिस्ट्रीचीच चर्चा: उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंची मिश्कील जुगलबंदी, गोरे-मोहिते वादाचेही पडसाद

Admin by Admin
July 13, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सातारा DPDC बैठकीत विकासापेक्षा महायुतीच्या केमिस्ट्रीचीच चर्चा: उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंची मिश्कील जुगलबंदी, गोरे-मोहिते वादाचेही पडसाद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सोमवारी झालेल्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७०२ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी मिळाली. मात्र विकासकामांच्या आढाव्यापेक्षा महायुतीतील नेत्यांचे एकाच व्यासपीठावर झालेले शक्तिप्रदर्शन, निधी वाटपावरील चर्चा आणि परस्परांतील हलक्याफुलक्या टोलेबाजीनेच बैठकीची अधिक चर्चा रंगली.

पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा उदयनराजे भोसले, माढ्याचे खा धैर्यशील मोहिते-पाटील तसेच जिल्ह्यातील आमदार एकाच मंचावर उपस्थित असल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदारांना विकासनिधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी, “खासदारांना योग्य तो निधी दिला जाईल. याबाबत प्रसारमाध्यमांनी चिंता करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट करत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

यानंतर खा उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील मिश्कील संवादाने वातावरण हलकेफुलके झाले. “तुमच्याकडे अनेक पार्ट्या बाकी आहेत,” अशी उदयनराजेंनी टिप्पणी करताच, “दिल्लीतला बंगला अजून दाखवला नाही. आधी खासदारकीची पार्टी तुम्हीच द्या,” असे प्रत्युत्तर शिवेंद्रसिंहराजेंनी दिले. या शाब्दिक जुगलबंदीवर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात सुरू असलेल्या राजकीय वादाचेही पडसाद बैठकीत उमटले. मोहिते-पाटील यांनी खासदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याचा मुद्दा डीपीडीसी च्या बैठकीपूर्वी उपस्थित करत सोलापूरमध्ये चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ रेकॉर्डिंगबाबतही आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. संबंधित रेकॉर्डिंग कृत्रिम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आले असावे, असेही त्यांनी म्हटले.

राजकीय चर्चांदरम्यान विकास आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी ९५ कोटी, आदिवासी बाह्य क्षेत्र घटक कार्यक्रमासाठी २.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मागील वर्षातील शंभर टक्के निधी खर्च झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व विभागांना १५ ऑगस्टपर्यंत प्रशासकीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आणि १५ सप्टेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेल्या ‘डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन’नुसार निधीचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.

बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारती, ट्रॉमा सेंटर, दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्धतेसह विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मात्र दिवसअखेर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो ७०२ कोटींचा आराखडा नव्हे, तर महायुतीतील नेत्यांचा राजकीय संवाद, निधीवाटपावरील भूमिका आणि रंगलेली मिश्कील टोलेबाजी. एकूणच नव्या चर्चांना निमंत्रण देणारी ठरली .

Previous Post

दुःखद बातमी | तीन महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू, मिरज तालुक्यातील कवलापूर, क.डिग्रज, मालगाव तीनही गावात शोककळा, व्यवहार ठप्प..!

Next Post

बेडगच्या ग्रामसभेत पाणंद रस्त्यावरून खडाजंगी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेडगच्या ग्रामसभेत पाणंद रस्त्यावरून खडाजंगी

बेडगच्या ग्रामसभेत पाणंद रस्त्यावरून खडाजंगी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group