• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

एचएसआरपी नसलेल्या ४२ वाहनांवर कारवाई

Admin by Admin
July 4, 2026
in क्राईम
1 min read
0
सांगली | ‘एचएसआरपी’ नसल्यास दंड एक हजार, पावती मात्र दोन हजाराची; ई-चलानामुळे आरटीओ अधिकारीही संभ्रमात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मिरज शहरातील प्रियदर्शनी हॉटेल लगत असणारा प्रशस्त गाळा भाड्याने देणे आहे.

२ लाख ३५ हजार वाहनांना एचएसआरपी नाही

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवून घेणे बंधनकारक होते. आता ही मुदत संपल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गुरुवारपासून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत ४२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे. जिल्ह्यात अद्याप सव्वा दोन लाख वाहनांनी ही नंबर प्लेट बसवलेली नसून ही टक्केवारी ३० टक्के आहे.

जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या एकूण ५ लाख ५९ हजार २९७ वाहनांपैकी ३ लाख २४ हजार २७६ वाहनधारकांनी आतापर्यंत एचएसआरपी बसवून घेतली आहे. हे प्रमाण सुमारे ७० टक्के आहे. अद्याप एचएसआरपी नसलेल्या वाहनांची संख्या २ लाख ३५ हजार २१ आहे.

एचएसआरपीसाठी दुचाकी व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, तर सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारण्यात येत असून, जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागत आहे. शेवटची मुदत ३० जून रोजी संपली असून, आता १ जुलैपासून प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.

२०१९ पूर्वीच्या वाहनधारकांनी कोणताही दंड किंवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तत्काळ एचएसआरपी बसवून घ्यावी. सध्या आरटीओ विभागाकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून नंबर प्लेट न बसवता वाहन चालवताना एकाहून अधिक वेळा सापडल्यास दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे.
– प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

रेठरेहरणाक्ष येथे विजेचा धक्का बसून शेतकर्‍याचा मृत्यू

Next Post

नोकरभरती स्थगितीविरोधात उच्च न्यायालयात जाणार; अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्हा बँकेतील २१ कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्याजासह वसूल होणार; आजी-माजी संचालकांना दिलासा

नोकरभरती स्थगितीविरोधात उच्च न्यायालयात जाणार; अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group