• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | वेदांत बंडगर हत्याप्रकरणी ‘मोक्का’चा प्रस्ताव सादर, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

Admin by Admin
July 4, 2026
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील संशयितांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी येथील १४ वर्षीय वेदांत बंडगर या बालकाची गोळ्या झाडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सांगली शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती, तसेच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवत या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि साथीदारांना अटक केली होती.

पोलिस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, या हत्येतील संशयितांनी केवळ वैयक्तिक वादातून हा गुन्हा केला नसून, त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संघटित टोळी बनवून हा कट रचला होता. या टोळीतील गुन्हेगारांवर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी या टोळीविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि संबंधित पोलिस ठाण्यामार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव कोल्हापूर विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आला आहे.

मिरज शहरातील प्रियदर्शनी हॉटेल लगत असणारा प्रशस्त गाळा भाड्याने देणे आहे.

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

अंजनीतील बैलगाडा शर्यतीत हाणामारीप्रकरणी २५ जणांवर गुन्हा

Next Post

रेठरेहरणाक्ष येथे विजेचा धक्का बसून शेतकर्‍याचा मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

रेठरेहरणाक्ष येथे विजेचा धक्का बसून शेतकर्‍याचा मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group