• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | जैन सभेच्या शताब्दी अधिवेशनाचे थाटात उद्‍घाटन संपन्न..

Admin by Admin
May 14, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | जैन सभेच्या शताब्दी अधिवेशनाचे थाटात उद्‍घाटन संपन्न..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – खबऱ्या प्रतिनिधी ; दक्षिण भारत जैन सभेच्या यंदाच्या शताब्दी अधिवेशनाचा उद्‍घाटन सोहळा शनिवारी सकाळी थाटात संपन्न झाला. नांदणी मठाचे प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या पावन सानिध्यात आणि सभा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन झाले.येथील नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर भव्य सभा मंडपात जैन सभेचे ऐतिहासिका अधिवेशन दोन दिवस चालणार आहे.

रविवारी (ता. १५) मुख्य दिवस आहे. आज उद्‍घाटन आणि शाखा अधिवेशनाची धामधुम सुरु झाली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विस्तार असलेल्या सभेच्या या सोहळ्यासाठी हजारो लोक सांगलीत दाखल झाले आहेत. दिवाणबहादूर अण्णासाहेब लठ्ठे नगर असे नाव देण्यात आले असून त्याचे उद्‍घाटन डॉ. भरत लठ्ठे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते धर्म ध्वजवंदन झाले. सहकार महर्षी स्व. शामराव पाटील यड्रावकर शांतिपीठ उद्‍घाटन माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्‍घाटन झाले. श्रावकरत्न रावसाहेब पाटील यांनी अध्यक्ष म्हणून पदग्रहण केले.

आज दिवसभरात जैन महिला परिषद, वीर महिला मंडळ मध्यवर्ती समिती, पदवीर संघना आणि वीर सेवा दन मध्यवर्ती समितीचे अधिवेशन होणार आहे. रविवारी मुख्य सोहळा असून त्याला मुख्यमंत्री उद्‍धव ठाकरे ऑनलाईन संवाद साधतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्यासह दोन्ही राज्यातील प्रमुख मंत्री उपस्थित राहणार आहेत.

यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष माधव डोर्ले, डॉ. अजित पाटील, सहखजिनदार पा. पा. पाटील, खजिनदार संजय शोटे, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील, आमदार अभय पाटील, सचिव प्रा. एन. डी. बिरनाळे, खजिनदार सागर वडगावे आदी प्रमुख उपस्थित आहेत.

Previous Post

LIVE UPDATE मुंबई -पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी…

Next Post

सां.मि. कु महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत वादावर चंद्रकांत दादा घेणार अंतिम निर्णय…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सां.मि. कु महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत वादावर चंद्रकांत दादा घेणार अंतिम निर्णय…

सां.मि. कु महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत वादावर चंद्रकांत दादा घेणार अंतिम निर्णय...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group