• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मायणी | बोगस दस्तऐवज प्रकरणी दोघांना पाच दिवस पोलिस कोठडी…

Admin by Admin
May 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मायणी | बोगस दस्तऐवज प्रकरणी दोघांना पाच दिवस पोलिस कोठडी…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वडूज – मायणी, ता. खटाव येथील पिराजी विष्णू भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही, ते जिवंत असल्याचे भासवून जमिनीचे बोगस दस्तऐवज तयार करण्यात आले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे यांना वडूज न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोन जणांच्या विरोधात महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार संशयितांवर फसवणूक प्रकरणी भादंवि कलमान्वये आणि ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी संजय काटकरला पोलिसांनी या आधीच अटक केली आहे. त्यानेच भिसे यांच्या नावाने सह्या केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आ. गोरे यांचे सहकारी महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे यांनाही अटक केल्यानंतर वडूज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Previous Post

मराठी मातीचा अनमोल हिरा : छत्रपती संभाजी राजे…

Next Post

“बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,”शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री,आणि स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही..”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,”शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री,आणि स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही..”

"बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,"शिष्य" एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री,आणि स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही.."

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group