• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप फॉरवर्ड केली.? दोघांवर गुन्हा; महापुरुषांबद्दल अयोग्य टिप्पणी..!

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मोबाईलवर आपापसात झालेल्या वादात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करुन संभाषणाची क्लिप व्हॉट्सॲपवर व्हायरल केल्याप्रकरणी दोन जणांवर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. अंकुश भास्कर कांबळे (वय ३६, व्यवसाय-चालक, रा. बोरगाव, ता. तासगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल नामदेव शिंदे (रा. नवे बोरगाव, ता. तासगाव) आणि समाधान शंकर लोंढे (रा. निंबळक, ता. तासगाव) यांच्यामध्ये मोबाईलवर वैयक्तिक वाद सुरू होता. दि. २० जून रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बोरगाव फाट्याजवळ या वादादरम्यान एका आरोपीने दुसऱ्या आरोपीस महापुरुषांबद्दल अपशब्द वापरण्यास चिथावणी दिली. त्यानंतर आरोपीने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.

एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी या आक्षेपार्ह संभाषणाची ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली आणि ती सोशल मीडियावरील ‘व्हॉट्सॲप’ ग्रुप्सवर प्रसारित केली. ही क्लिप समाजात पसरल्यामुळे नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विशाल टकले यांनी तात्काळ बोरगाव फाट्याजवळील घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी दोन्ही समाजातील प्रमुख लोकांना एकत्र घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

याप्रकरणी दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम २९९, २९६, ६१, तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(व्हॉली), ३(२)(व्हॉली ए) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Previous Post

आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

Next Post

कोयत्याच्‍या धाकाने चोऱ्या करणारा सराईत जेरबंद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

कोयत्याच्‍या धाकाने चोऱ्या करणारा सराईत जेरबंद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group