• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोयत्याच्‍या धाकाने चोऱ्या करणारा सराईत जेरबंद

आठ गुन्हे उघड; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कोयता व चाकूचा धाक दाखवून घरात जबरी चोरी, घरफोडी तसेच दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. करण ऊर्फ करंज रज्जा शिंदे (वय १९, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी, असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ८ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे बाबुराव बलभीम सुतार यांच्या घरात चोरट्यांनी कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना, तासगावमधील पाचव्या मैलाजवळ एक संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने तिथे छापा टाकून करण शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले. अधिक चौकशीत हे दागिने देवराष्ट्रे व कुंडल परिसरातून कोयत्याचा धाक दाखवून चोरल्याचे निष्पन्न झाले. संशयिताने आपल्या साथीदारांच्या मदतीने एकूण ८ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

या कारवाईमुळे कुंडल, पलूस, आष्टा, कुरळप आणि चिंचणी वांगी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडी व जबरी चोऱ्यांचे ७ गुन्हे आणि सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. संशयिताकडून ८ लाख रुपये किमतीचे ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पकडण्यात आलेला संशयित करण शिंदे आणि त्याचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर सांगली व शेजारील जिल्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, दुचाकी चोरी आणि थेट ‘मकोका’सारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून, पोलिस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण, चिंचणी वांगी पोलिस आणि सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव करत आहेत.

Previous Post

व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप फॉरवर्ड केली.? दोघांवर गुन्हा; महापुरुषांबद्दल अयोग्य टिप्पणी..!

Next Post

लग्नाच्या आमिषाने महिलेची दहा लाखाची फसवणूक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

लग्नाच्या आमिषाने महिलेची दहा लाखाची फसवणूक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group