• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर बुलडोझर ; अहिल्यानगरमधील पहिलीच कारवाई, माजी खासदार विखे यांनी शब्द पाळला

Admin by Admin
June 18, 2026
in क्राईम, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी बातमी | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर बुलडोझर ; अहिल्यानगरमधील पहिलीच कारवाई, माजी खासदार विखे यांनी शब्द पाळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राहाता शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर घरावर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने बुलडोझर फिरवीत, अतिक्रमण केलेले बांधकाम उद्ध्वस्त केले.

अशा प्रकारची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. ही कारवाई आज, गुरूवारी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी आपला शब्द खरा करून दाखवल्याने या धडक कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

मतदारसंघातील महिला व मुलींची छेड काढली किंवा त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहिले, तर त्याच्या घरावर मी स्वतः जेसीबी चालवणार, असा इशारा काही दिवसांपूर्वी माजी खासदार विखे यांनी दिला होता. हा शब्द या कारवाईने त्यांनी खरा करून दाखविला. शहरातील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली होती. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपी हरिदास गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

पिडित मुलीला महिला पोलीस उपनिरीक्षकाने दमदाटी केल्याच्या निषेधार्थ मुलीच्या नातेवाईकांनी व शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा आणून संबंधित महिला अधिकाऱ्याची बदली करावी व मुख्य आरोपीला सहकार्य करणाऱ्या इतर आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी आरोपी हरिदास गायकवाडचे घर पाडण्यासाठी नोटीस बजावल्याचे सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी राहता येथील कार्यक्रमात माजी खासदार विखे यांनी शहरातील गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. साकुरी आणि राहाता शहरातील महिलांच्या सुरक्षेचा हवाला देत महिलांना व मुलींना त्रास देणाऱ्यांच्या घरावर जेसीबी चालवण्याचा इशारा त्यांनी गुन्हेगारांना दिला होता. त्यांनी हा इशारा कृतीत आणला.

राहता नगरपालिकेने नगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत, पोलीस बंदोबस्तात आरोपीच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर फिरवला. अवघ्या काही वेळातच आरोपीचे घर उद्ध्वस्त करून विखे यांनी गुन्हेगारांना कडक संदेश यानिमित्ताने दिला आहे.

गुन्हेगारांनी बोध घ्यावा

शिर्डी मतदारसंघातील महिला व मुलींची छेड काढणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा इशारा माजी खासदार सुजय विखे यांनी दिला होता. त्यांच्या सूचनेप्रमाणे कारवाई करण्यात आली. पालिका प्रशासन, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. आरोपी गायकवाड याचे पाच ते सहा ठिकाणी कच्चे व पक्के बांधकाम असलेली अतिक्रमणे होती. ती अतिक्रमणे बुलडोझरने उद्ध्वस्त केली. महिला व मुलींच्या विरोधात गैरकृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी यापुढे बोध घ्यावा.-डॉ. स्वाधीन गाडेकर, नगराध्यक्ष, राहाता नगरपरिषद.

Previous Post

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान, ६ जागा बिनविरोध विजयी; वाचा संपूर्ण अपडेट

Next Post

ब्रेकिंग | कुपवाडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ७ जणांवर कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | कुपवाडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ७ जणांवर कारवाई

ब्रेकिंग | कुपवाडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ७ जणांवर कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group