• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इस्लामपुरात आठवडा बाजारावरून वादंग.?

Admin by Admin
February 3, 2026
in क्राईम
1 min read
0
इस्लामपुरात आठवडा बाजारावरून वादंग.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

इस्लामपूर येथील आठवडी बाजाराच्या स्थलांतरास विरोध करत भाजीपाला विक्रेत्यांनी सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला. व्यापाऱ्यांचा विरोध पाहता रविवारचा बाजार आहे त्याच ठिकाणी व मार्केट यार्ड परिसरात, तर गुरुवारचा बाजार अंबिका उद्यान परिसरात भरवण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला.मात्र हा बाजार वाहतुकीला अडथळा न करता भरवण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

शहरात भाजी मार्केट इमारतीचे काम सुरू असल्यामुळे गुरुवारी व रविवारी भरणारा आठवडा बाजार तहसील कार्यालयासमोरील चौकात रस्त्यावरच भरत होता. यामुळे या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. तसेच तेथील व्यावसायिकांनाही या बाजाराचा फटका बसत होता. त्यामुळे व्यापारी संघटनेने हा बाजार स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे नगरपालिकेने हा बाजार अंबिका उद्यान परिसरात भरवण्याचा निर्णय घेतला होता. याला काही स्थानिक भाजी विक्रेत्यांनी विरोध केला.

नगरपालिका बाजार स्थलांतरित करण्याबाबत ठाम असल्याने सोमवारी भाजपचे नेते विक्रम पाटील, मंडल अध्यक्ष संदीपराज पवार, विजय पवार, मानसिंग पाटील, नरेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच अडवला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर विक्रम पाटील, विजय पवार, मानसिंग पाटील व व्यापारी प्रतिनिधी तसेच नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रा. अरुणादेवी पाटील तसेच नगरसेवक संग्रामसिंह पाटील, सुभाष सूर्यवंशी, शुभांगी शेळके, डॉ. संग्राम पाटील व सत्ताधारी नगरसेवकांची बैठक होऊन यावर तोडगा काढण्यात आला.

Previous Post

सांगलीत महापौर भाजपचा, उपमहापौर राष्ट्रवादीचा अन् स्थायी समिती सभापती ‘या’ पक्षाचा होणार..?

Next Post

जयसिंगपूर | दानोळीत मगरीचा वावर.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयसिंगपूर | दानोळीत मगरीचा वावर.?

जयसिंगपूर | दानोळीत मगरीचा वावर.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group