• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळजनक | अजितदादांचा अपघाती अंत, ‘तो’ पायलट जिवंत; बायकोनं ‘स्टोरी’ टाकली अन् खरी स्टोरी समोर

Admin by Admin
February 2, 2026
in क्राईम, राजकीय
1 min read
0
खळबळजनक | अजितदादांचा अपघाती अंत, ‘तो’ पायलट जिवंत; बायकोनं ‘स्टोरी’ टाकली अन् खरी स्टोरी समोर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी सकाळी अपघात झाला. त्यावेळी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. बारामतीच्या विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं. विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला.

यानंतर पुढच्या काही मिनिटांत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आणि माहिती समोर आली. मृतांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. मृतांचे फोटो समोर आले. पायलट्सचे फोटो व्हायरल झाले. यानंतर कॅप्टनच्या पत्नीनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली.

अजित पवार यांच्या विमानाला अपघात होताच सोशल मीडियावर माहितीचा महापूर आला. दुर्घटनेचे व्हिडीओ, फोटो समोर आले. २८ तारखेला व्हिएसआर व्हेंचर्सचं लियारजेट ४५ विमान कुठून कुठे आणि किती वाजता जाणार होतं, या विमानाचं सारथ्य करण्याची जबाबदारी कोणावर होती, याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांची नावं होती. त्यामुळे अनेकांनी कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो शोधले. लिंक्डइनवर पायलटच्या गणवेशातील साहिल मदान यांचा फोटो काहींना सापडला. त्यानंतर तो व्हायरल झाला.

अजित पवार यांच्या विमानाचं सारथ्य कॅप्टन साहिल मदान आणि यश यांच्याकडे नव्हतचं. या विमानावरील कॅप्टन बदलण्यात आले होते. साहिल यांची जागा कॅप्टन सुमित कपूर यांनी घेतली होती. याची माहिती सुरुवातीला कोणालाही नव्हती. मुळात सुमित कपूर हे अजित पवारांना घेऊन बारामतीला जाणार नव्हते. त्यांच्यावर ऐनवेळी ही जबाबदारी देण्यात आली. त्यांचा या विमान अपघातात मृत्यू झाला.

विमान अपघातानंतर मूव्हमेंट लेटर व्हायरल झालं. त्यात कॅप्टन साहिल मदान यांचं नाव होतं. त्यामुळे त्यांचे फोटो व्हायरल झाले. यानंतर एका इन्स्टाग्राम युझरनं एक स्टोरी अपलोड केली. ‘कृपया ही बातमी काढा. कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते अपघातग्रस्त विमानाच नव्हते,’ असं स्पष्टीकरण संजाम सहनी यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून दिलं. सहनी या पेशानं मेकअप आर्टिस्ट आहेत.

विमान अपघातानंतर अनेकांनी सहनी यांना कॉल केले, मेसेज केले. सहनी यांचे पती कॅप्टन साहिल मदान यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा अनेकांचा समज झाला. त्यांनी सहनी यांना कॉल केले. काळजीपोटी विचारणा करणाऱ्या सगळ्यांचे सहनी यांनी आभार मानले. यासोबतच सहनी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये.? बड्या नेत्याचा मोठा दावा

Next Post

मोठी बातमी | २५ हजार कोटींच्या सहकारी बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर कायदेशीर चौकशी सुरूच; ईडीचा आक्षेप, प्रकरण न्यायालयात प्रलंबित

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | २५ हजार कोटींच्या सहकारी बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर कायदेशीर चौकशी सुरूच; ईडीचा आक्षेप, प्रकरण न्यायालयात प्रलंबित

मोठी बातमी | २५ हजार कोटींच्या सहकारी बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर कायदेशीर चौकशी सुरूच; ईडीचा आक्षेप, प्रकरण न्यायालयात प्रलंबित

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group