• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | आकर्षक शोभायात्रेने महाराष्ट्राच्या ५९ व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

Admin by Admin
January 26, 2026
in सामाजिक
1 min read
0
सांगली | आकर्षक शोभायात्रेने महाराष्ट्राच्या ५९ व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

महाराष्ट्राच्या ५९ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ भव्य शोभा यात्रेने झाला. सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजींच्या पावन सान्निध्यात या तीन दिवसीय संत समागमाचे आयोजन सांगली मधील सांगलवाडीच्या मैदानात करण्यात आले आहे.

मानवतेच्या नावे संदेश देताना सतगुरू माताजी म्हणाल्या, की प्रभु-परमात्म्याने दिलेले मानवीय जीवन सुंदर करण्यासाठी, आत्ममंथनाने आपल्या अध्यात्मिक जीवनाला महत्वपूर्ण बनवावे लागेल.

सतगुरू माताजींनी पुढे सांगितले, की आपल्या कर्तव्यांसोबत आत्ममंथनाला जीवनाचा भाग बनवून स्वतः मध्ये सुधार करायचा आहे. जेव्हा आपण स्वतः यथायोग्य मानव बनू आणि सेवा भावनेने युक्त जीवन व्यतीत करू, तेव्हा विश्व कल्याणामध्ये सहभागी होऊ शकतो.

शोभा यात्रा

तत्पूर्वी, सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे समागम स्थळी आगमन होताच समागम समितीचे चेअरमन श्री.शंभुनाथ तिवारी यांनी सतगुरु माताजी तसेच समागम समितीचे समन्वयक श्री.कल्याण झांबरे यांनी आदरणीय निरंकारी राजपिताजी यांचे पुष्पगुच्छ देऊन समस्त साध संगतच्या वतीने हार्दिक स्वागत केले.

तदनंतर हे दिव्य युगुल समागमाच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या अगदी समोर सांगली-ईश्वरपुर रोडलगत फुलांनी सुशोभित पालखीमध्ये विराजमान झाले.

हृदयसम्राट सतगुरुदेवांना आपल्या सान्निध्यात पाहून लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविक भक्तगणांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या भक्तगणांनी ‘धन निरंकार’च्या जयघोषाने आपला आनंद व्यक्त केला ज्याने संपूर्ण समागम परिसर दुमदुमून गेला.

दिव्य युगुलाच्या पालखी समोरुन पारंपारिक लोककला, लोकनृत्ये, सांस्कृतिक व सामाजिक संदेश देणाऱ्या प्रस्तुती दर्शविणारी भव्य शोभायात्रा दिव्य जोडीला अभिवादन करत पुढे सरकत होती. या रंगी-बेरंगी शोभायात्रोमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून आलेले कलाकार भक्त तुकड्या-तुकड्यांनी सहभागी झाले होते.

कलात्मक रूपात श्रद्धाळु भक्तांकडून केल्या जाणाऱ्या अभिवादनाचा स्वीकार करत दिव्य युगुल आपल्या सुहास्य वदनाने सर्वांना आपले आशीर्वाद प्रदान करत होते.

शोभा यात्रेची सुरवात सेवादल बँडने झाली आणि त्यानंतर त्यामध्ये लेझिम, हलगी नृत्य, दक्षिण भारतीय प्रस्तुति, एकत्वचा गुच्छ, विज्ञान व अध्यात्म, यक्षगान, सिंधी नृत्य, बंधनातून आनंदाकडे, सहयोग व संतुलन, महिला लेझिम, मिशनचे प्रकाशन व पत्रिका, पंजाबी नृत्य, नाशिक ढोल, मिशनचे सामाजिक कार्य, निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युज़िक ॲन्ड आर्टसची प्रस्तुती इत्यादि सादरीकरण केले गेले जे पाहून उपस्थित प्रेक्षकवृंदाने टाळ्यांच्या गजरात आपला आनंद प्रकट केला.

शेवटी, दिव्य युगुल पालखीसह या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आणि ही शोभा यात्रा कलात्मक रीतीने तयार करण्यात आलेल्या समागमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊन संपन्न झाली.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | माजी आमदारांच्या घरासमोर काळी जादू, बंगाली बाबूसह दोघांची धिंड काढत पोलिसांच्या हवाली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..!

Next Post

सांगली | खासगी नर्सिंग महाविद्यालयांचे अस्तित्व धोक्यात! ७ नर्सिंग कॉलेजेसमध्ये ‘शून्य’ प्रवेश.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी नर्सिंग महाविद्यालयांचे अस्तित्व धोक्यात! ७ नर्सिंग कॉलेजेसमध्ये ‘शून्य’ प्रवेश.?

सांगली | खासगी नर्सिंग महाविद्यालयांचे अस्तित्व धोक्यात! ७ नर्सिंग कॉलेजेसमध्ये 'शून्य' प्रवेश.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group